30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeमनोरंजनTripling Season 3: द वायरल फीवर निर्मित 'ट्रिपलिंग'चा तिसरा हंगाम लवकर...

Tripling Season 3: द वायरल फीवर निर्मित ‘ट्रिपलिंग’चा तिसरा हंगाम लवकर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'ट्रिपलिंग' चा तिसऱ्या सीझनमध्ये एकूण पाच भाग असतील. या भागांमध्ये तीन भावंडांच्या आयुष्याचे सार आणि त्यांचे एकमेकांशी असलेले नाते दाखवले जाणार आहे. त्याशिवाय या सीझनमध्ये हे तीन भावंड नवीन प्रवासाला सुरुवात करत असताना त्यांचे पालक आणि त्यांचे संबंधित भागीदार सुद्धा त्यांच्यासोबत सामील होतील.

लोकप्रिय ऑनलाइन शो  ‘ट्रिपलिंग’ चा तिसरा सीझन तीन वर्षांच्या कालावधीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या शोमध्ये अभिनेते सुमीत व्यास, मानवी गाग्रू आणि अमोल पराशर यांची प्रमुख भूमिका आहे. ‘ट्रिपलिंग’ ची पटकथा सुमीत व्यास यांनी लिहीली आहे तर याचे संवाद सुमीत व्यास आणि अब्बास दलाल यांचे आहेत. आगामी सीझनचे दिग्दर्शन नीरज उधवानी यांनी केले आहे.

‘ट्रिपलिंग’ च्या तिसऱ्या सीझनबदद्ल भाष्य करताना दिग्दर्शक नीरज उधवानी म्हणाले की, सीझन 3 चे वेगळेपण हे कुटुंबावर केंद्रित आहे. आपण सर्वजण चंदन, चितवन आणि चंचल यांना ओळखतो आणि प्रेम करतो. पण त्यांच्यातील विचित्रपणा आणि विलक्षणपणा कोठून येतो? त्यांचे पालक कोण आहेत? ते त्यांच्यासारखेच वेडे आहेत आणि त्यांच्या स्वत:च्या जीवनात ते असामान्य निवडी करतात ज्याचा सामना या तीन भावंडांना करावा लागतो.

‘ट्रिपलिंग’ या ऑनलाइन शोच्या पहिल्या दोन सीझन्सला त्याच्या वेगळया पटकथेमुळे व सर्व अभिनेत्यांच्या चांगल्या अभिनयामुळे चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता.

आगामी सीझनमधून चाहते काय अपेक्षा करू शकतात, याविषयी नीरज पुढे म्हणाला की, या सीझनमध्ये सर्व काही आहे. त्यामध्ये या तीन भावंडामधील नेहमीचे विनोद आणि त्यांच्या आयुष्यात घडणारा भरपूर ड्रामा याचा समावेश आहे. त्यामुळे मला असे वाटते की, लोकांना हा सीझन सुद्धा पहिल्या दोन सीझनप्रमाणे नक्की आवडेल.

हे सुद्धा वाचा –

Eknath Shinde: एकनाथ शिंदेनी बेस्ट, आरोग्य कर्मचारी व शिक्षकांना दिवाळीचा बोनस‍ केला जाहीर

Western Railway News: पश्चिम रेल्वेमध्ये 1 ऑक्टोबरपासून 31 नवीन एसी लोकल होणार दाखल

द वायरल फीवर (TVF) चे संस्थापक अरुणाभ कुमार या शो बदद्ल भाष्य करताना म्हणाले की, एखादया मध्यमर्गीय भारतीय कुटुंबाला जेव्हा एका मोठ्या वळणाचा सामना करावा लागतो. तेव्हा आपण नेहमीच असे म्हणतो की संकटकाळी कुटुंबातील सदस्यच आपल्या कामाला येतात. ‘ट्रिपलिंग’चा सीझन 3 तयार करताना सुमीत आणि मला शोच्या मूळ गाभ्याकडे लक्ष केंद्रीत करायचे होते.  या शोच्या तिसऱ्या हंगामामध्ये रोड ट्रीपच्या ऐवजी आम्ही ट्रेकचा समावेश केला आहे. त्यामध्ये या तीन भावंडामध्ये होणारे नेहमीचे विनोद आणि इतर मानवी भावनांचा समावेश होतो.

‘ट्रिपलिंग’ चा तिसऱ्या सीझनमध्ये एकूण पाच भाग असतील. या भागांमध्ये तीन भावंडांच्या आयुष्याचे सार आणि त्यांचे एकमेकांशी असलेले नाते दाखवले जाणार आहे. त्याशिवाय या सीझनमध्ये हे तीन भावंड नवीन प्रवासाला सुरुवात करत असताना त्यांचे पालक आणि त्यांचे संबंधित भागीदार सुद्धा त्यांच्यासोबत सामील होतील.

‘ट्रिपलिंग’ शोचा तिसरा ‍हंगाम लवकरच ZEE5 वर प्रेक्षकांना पाहण्यास उपलब्ध होईल.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी