31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रसफाईगाराची मुलगी, धुणी भांडी करणाऱ्या महिलेचा मुलगा जाणार परदेशी शिक्षणासाठी, धनंजय मुंडेंच्या...

सफाईगाराची मुलगी, धुणी भांडी करणाऱ्या महिलेचा मुलगा जाणार परदेशी शिक्षणासाठी, धनंजय मुंडेंच्या निर्णयाचा फायदा

टीम लय भारी

मुंबई : परदेशी शिक्षण घ्यायचे असले तर ते केवळ धनदांडग्यांनाच शक्य असते. पण तळागाळात अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्यांचीही मुले शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतात. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या समाजहिताच्या भूमिकेमुळे हे शक्य झाले आहे (This has been made possible by Dhananjay Munde role in the cause of society).

‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती’ ही योजना सामाजिक न्याय विभागाकडून राबविली जाते. अनुसूचित जातीच्या मुला – मुलींसाठी ही योजना आहे. दरवर्षी ७५ मुलांना या योजनेअंतर्गत परदेशात पाठविले जाते.

खळबळजनक : दोन IAS अधिकाऱ्यांचा हावरटपणा, सामान्य लोकांच्या योजनांवर मारला डल्ला !

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना बजावले, योजना गोरगरीबांपर्यंत पोहोचवा

‘मेघवाल’ अर्थात सफाईगार हा अत्यंत मागासलेला समाज महाराष्ट्रात आहे. ‘अनुसूचित जाती’च्या प्रवर्गामध्ये या समाजाचा समावेश होतो. नाशिक येथील सुरेश मारू हे या समाजातील आहेत. एका खासगी रूग्णालयात सफाईचे काम ते करतात. जेमतेम १० हजार रूपये सुद्धा पगार नसेल. मुलीला परदेशात शिक्षणासाठी पाठविण्याची ते कल्पनाही करू शकत नाहीत, अशी त्यांची बिकट स्थिती आहे (He is in a dire situation as he cannot even imagine sending his daughter abroad for education).

राज्य सरकारच्या या योजनेमुळे त्यांची मुलगी देवयानी हिला परदेशी शिक्षणाची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियातील ‘ऑस्ट्रेलिया विद्यापीठा’त तिला ‘मास्टर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे.

‘लय भारी’चे विषय सामान्यांना आपले वाटतात : धनंजय मुंडे

Mumbai: State to enact legislation to ensure effective use of funds for the poor

योगेश बडेकर याची परिस्थिती तर अत्यंत हलाखीची. तो अवघा आठ महिन्याचा असताना त्याचे वडील वारले. सगळे कुटुंब मुंबईवरून गावी (कुर्डूवाडी, सोलापूर) स्थलांतरीत झाले. योगेशला तीन बहिणी आहेत. तिघींचे विवाह नातलगांच्या मदतीने झाले.

योगेश शिक्षणात प्रचंड हुशार. दहावीत त्याने चांगले गुण मिळविले होते. नंतर त्याने पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमातही चमक दाखविली. त्या जोरावर त्याला अभियांत्रिकी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळाला होता.

त्याची आई लता बडेकर दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करतात. नातलगांची थोडीफार मदत आणि आईने धुणीभांडी करून मिळविलेल्या पैशातून त्याचे आतापर्यंत शिक्षण पूर्ण झाले. योगेशनेच स्वत: ही माहिती ‘लय भारी’ला दिली (Yogesh himself gave this information to Laya Bhari).

‘परदेशी शिष्यवृत्ती योजना असल्याचे मला कुठून तरी समजले. मला त्यातील काही माहित नव्हते. मी धनंजय मुंडेना संपर्क साधला. त्यांनी मला फार मदत केली. त्यांच्या ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर कसा करायचा इथपासूनची सगळी माहिती मला दिली. जगातील आठव्या स्थानावर असलेल्या लंडनमधील ‘इम्पिरियल कॉलेज’ या विद्यापीठात मला प्रवेश मिळाला आहे. धनंजय मुंडे यांनी योजनेचा लाभ मिळवून दिला त्यामुळेच मी आता परदेशात जाऊ शकणार असल्याचे’ योगेशने ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

Dhananjay Munde role in the cause of society
योगेश बडेकर

परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा आदेश नुकताच जारी झाला आहे. त्यात योगेशचेही नाव आहे. नाव पाहिल्यानंतर योगेशने धनंजय मुंडे यांना पत्र लिहून आभार व्यक्त केले. या पत्रात त्याने आपल्या आईविषयी कविता लिहिली आहे. ही कविता वाचल्यानंतर कुणाच्याही डोळ्यातून पाणी येईल.

Dhananjay Munde role in the cause of society
योगेश बडेकर यांने लिहिली आईसाठी कविता

शिष्यवृत्तीमधील धनदांडग्यांची मक्तेदारी मोडीत

आतापर्यंत या योजनेचा लाभ धनदांडगी मंडळी घेत होती. कळस म्हणजे, IAS अधिकाऱ्यांच्या मुलांनीही या योजनेचा लाभ उठवला आहे.

मंत्रालयात बसलेले ‘बाबू’ या योजनेची माहिती तळागाळातील गोरगरीब मुलांपर्यंत पोचणार नाही, याची पुरेपुर काळजी घ्यायचे.

यंदा मात्र तसे झाले नाही. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेची जाहिरात मोठ्या प्रमाणात केली. जाहिरातीसाठी तीन वेळा मुदतवाढ दिली. त्यामुळे गोरगरीब व हलाखीचे जीवन जगणाऱ्या मुलांनाही या योजनेची माहिती मिळाली.

यंदा पहिल्यांदाच सर्वाधिक ३२५ अर्ज आले. त्यातील १७० अर्ज पात्र ठरले. या पात्र अर्जांमध्ये गोरगरीब मुलांची संख्या फार मोठी असल्याची माहिती सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी