31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्ररोहित पवारांनी रेमडेसिवीर चोरुन आणले का? : प्रविण दरेकर

रोहित पवारांनी रेमडेसिवीर चोरुन आणले का? : प्रविण दरेकर

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परंतु राज्यात रेमडिसेवीरवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.

संपूर्ण देशात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना गुजरातमध्ये भाजपा कार्यालयात हे इंजेक्शन दिले जात असून हे राजकारण नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते नवाब मालिक  यांनी केला होता. नवाब मलिक यांच्या आरोपांवर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांनी गुजरातमध्ये रेमडेसिवीर वाटल्याचा गदारोळ करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेमडेसिवीर कुठून चोरुन आणले? असा प्रश्न विचारला होता. माझे नवाब मलिकांना आवाहन आहे की, रोहित पवारांनी सोलापूरसाठी राष्ट्रवादीच्या पदधिकाऱ्यांना रेमडेसिवीर वाटल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन रोहित पवारांनी रेमडेसिवीर कुठून चोरुन आणले हे विचारणार का? त्यांच्यामुळे आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचे ते कार्ट ही भूमिका मलिक यांनी थांबवावी, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच, नवाब मलिक निष्पक्ष असतील तर रोहित पवारांवर रेमडेसिवीर चोरुन आणल्याचा गुन्हा दाखल करणार का?; असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापूरसाठी ७५ रेमडिसिवीर इंजेक्शन पाठवून दिली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वेल्फेअर फंडाच्या माध्यमातून हे इंजेक्शन्स देण्यात आली आहेत. सोलापूर शहरातील गरीब आणि गरजू नागरीकांना ही इंजेक्शन्स देण्यात येणार आहेत. सदरचे कीट आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर आणि माजी नगरसेवक दीपक राजगे यांच्याकडे सुपूर्त केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी