31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रजेजुरी गडावर १७ ऑक्टोबरला होणार ओबीसींचा दसरा मेळावा

जेजुरी गडावर १७ ऑक्टोबरला होणार ओबीसींचा दसरा मेळावा

टीम लय भारी

पुणे : रविवारी पुण्यातील सिंहगडरोडवर राष्ट्रसेवादळाच्या सभागृगात राज्यभरातील विविध समूहांची बैठक झाली होती. या बैठकीत ओबीसींच्या प्रश्नांविषयी चर्चा झाली. (Dussehra meet of OBCs will be held on October 17 at Jejuri fort)

सर्वच वक्त्यांनी आवाहन केले की येत्या रविवारी १७ ऑक्टोबरच्या जेजुरी गड दसरा बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

उद्धव ठाकरेंकडून पोलिसांना दसऱ्याची भेट, ४५ हजार जणांची होणार पदोन्नती

बेकायदेशीर वैद्यकीय अधिकाऱ्याची हकालपट्टी करावी, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

उपस्थित मान्यवरांनी ओबीसी समाजाचे गेलेले आरक्षण, तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती  यांचे नोकरीतील प्रमोशनसाठीचे आरक्षन हे असंविधानिक असल्याचे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले शपथपत्र यावर सर्वच मान्यवरांनी तीव्र आक्षेप आणि संताप नोंदविला.

या बैठकीचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ ओबीसी विचारवंत प्रा. श्रावण देवरे यांनी  आज महाराष्ट्राला महात्मा ज्योतिबा फुले आणि  रामस्वामी पेरियार यांच्या विचारांची गरज असून तामिळनाडू त्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसी चा सामाजिक व राजकीय लढा उभा करण्याचा विचार प्रकट केला. आता केवळ जातींची बेरीज नाही तर विचारांची देखील बेरीज करणे ओबीसीला गरजेचे आहे अशी भूमिका मांडली.

ज्येष्ठ नेते सुधाकरराव आव्हाड यांनी वारकरी संप्रदायात बहुजन समाजाच्या ऐक्याची बीजे पेरली गेल्याची आठवण करून देत आज ओबीसीला एकत्र येण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून प्रेरणा मिळेल ही भावना व्यक्त केली. त्याच बरोबर आता हा  कायदेशीर लढा देखील ओबीसी ना  लढावा लागेल ही भूमिका मांडली.

बैठकीचे निमंत्रक नवनाथ पडळकर यांनी आपली भूमिका मांडताना ओबीसी VjNT यांना आज पर्यंत सर्वच प्रस्थापित आणि विस्थापित पक्षांनी वापरून घेतले परंतु त्यांच्या प्रश्नाची कायमची उकल कोणीच काढली नाही, म्हणून ओबीसी VJNT समूहाने आता कोणाच्या वळचणीला न जाता, दुसऱ्यावर विसंबून न राहता स्वतःचा लढा स्वतःच उभा करावा , स्वतःची जनगणना करून घेण्यासाठी  आवश्यक सर्व मार्ग तयार ठेवावेत.

 ओबीसींच्या आरक्षणात कोणत्याही सबल पुढारलेल्या समाजाची घुसखोरी हाणून पाडण्यासाठी ओबीसीचे संघटन अत्यावश्यक आहे. अशी घुसखोरी येत्या काळात होऊ देणार नाही. अशी भूमिका त्यांनी मांडली.

या बैठकीत घेतलेले निर्णय

पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला;…. मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही याचं दु:ख नाही!

Dussehra 2021: धनवान बनने के लिए दशहरा के दिन कर लें यह आसान काम, पूरे साल नहीं होगी पैसे की कमी

1) जातनिहाय जनगणना तात्काळ सुरू व्हावी यासाठी राज्यभर सरकारवर दबाव वाढवण्यासाठी व्ह्यूवचना तयार करनार.

2) ओबीसीचे राजकीय आरक्षण घालविण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारे सारखीच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधनार प्रसंगी दबावतंत्र अखणार .  हे आरक्षण वाचविण्यासाठी आवश्यक इम्परिकल डाटा गोळा करणाऱ्या राज्य मागासवर्गीय आयोगाला तात्काळ बजेटमधील रू. 435कोटी निधी देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना भेटून ओबीसी VJNT ची बाजू मांडणार आहोत.

 तसेच केंद्र सरकारला विनंती करून न्यायालयांमध्ये आवश्यक असणारा जनगणनेचा डाटा तात्काळ द्यावा म्हणून संघटनात्मक पद्धतीने दबाव निर्माण करणार.

३) विमुक्त जाती व भटक्या जमाती चे प्रमोशन मधील आरक्षण विरोधी राज्य सरकारचे शपथपत्र तात्काळ दुरुस्त करून, सुधारित शपथपत्र पुन्हा न्यायालयात सादर करावे आणि आरक्षण  वाचवावे.

3) राज्यातील सर्व ओबीसी VJNT समाजातील विविध संघटना, गट-तट बाजूला ठेवून एकत्रित लढा उभा करण्यासाठी येत्या १७ ऑक्टोबर रोजी दुपारी जेजुरी गडाच्या पायथ्याशी ओबीसी , विमुक्त जाती, भटक्या जमाती  समाज बांधवांची राज्यव्यापी दसरा नियोजन बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची व आंदोलनाची पुढील दिशा तेथेच घोषित करणार असल्याची माहिती ओबीसी व्हीजे एनटी चळवळीचे राज्य समन्वयक तथा दसरा मेळावा संयोजन समितीचे प्रमुख नवनाथ पडळकर यांनी केली.

 या बैठकीला प्रा श्रावण देवरे,  सुधाकरराव आव्हाड, राजेश आंधळे , डॉ पी.बी.कुंभार, दशरथ कुलधर, पै. आप्पासाहेब आखाडे, रामभाऊ मरगळे, संतोष आंबेकर, भरत लोहकरे, संजय हाके, अशोक कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी