31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात

राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात

टीम लय भारी

अळमनेर l  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. अमळनेरवरून जळगावकडे येत असताना गाडीचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं यात एकनाथ खडसे यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत.

एकनाथ खडसे यांनी ट्विट करून ही माहिती दिली. एकनाथ खडसे हे आज रविवार (१ नोव्हेंबर) अमळनेर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते गाडीने जळगावकडे येत असताना धरणगाव जवळ गाडीचे टायर फुटले. गाडीचा वेग कमी असल्यानं व चालकाने प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली.

या गाडीत एकनाथ खडसे यांच्यासह काही कार्यकर्तेही होते. सगळे जण सुखरूप आहेत. एकनाथ खडसे यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली.

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत –एकनाथ खडसे

“आज अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडीचा वेग कमी असल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही,” अशी माहिती खडसे यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी