35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रराजपाल्यांच्या हस्ते माणगांव तालुक्याचे सुपुत्र गणेश तुकाराम गोरेगावकर यांचा सत्कार

राजपाल्यांच्या हस्ते माणगांव तालुक्याचे सुपुत्र गणेश तुकाराम गोरेगावकर यांचा सत्कार

टीम लय भारी 

मुंबई : माणगांव तालुक्यातील चांदोरे येथील सुपुत्र गणेश तुकाराम गोरेगांवकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, कक्ष ३, मुंबई यांना राजभवन मुंबई येथे राज्यपाल,महाराष्ट्र राज्य, भगतसिंग कोशीयारी यांच्या हस्ते पोलीस दलातील त्यांचे 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतील निष्कलंक व उत्कृष्ट कामगिरी करता राष्ट्रपतींचे पोलीस पदक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

चांदोरे गाव येथील मूळ रहिवासी गणेश तुकाराम गोरेगांवकर यांचे बाराबी पर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. १ नोव्हेंबर 1988 ला मुंबई पोलीस दलात भरती झाले. त्यानंतर त्यांनी सशस्त्र दल, नायगाव, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा मुंबई या ठिकाणी पोलिस दलातील कर्तव्य पार पाडली.

सेवा बजावत असताना आतापर्यंत गणेश गोरेगांवकर यांना ३६४ चांगल्या नोंदी असून ४४२ बक्षिसे मिळाली आहेत. त्यांना त्यांच्या विशेष महत्वपूर्ण कामगिरीसाठी सन २०१७ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील मानांकित अशा “पोलीस महासंचालक” पदकाने सन्मानित केले गेले.

सन 2018 साली क्लिष्ट व गुंतागुंतीचा खुनाचा गुन्हा उघड केल्याबद्दल त्यांना बेस्ट क्राईम डिटेक्शन पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे, तसेच बनावट नोटांचे गुन्हे, अमलीपदार्थ विरोधी गुन्हे असे गुन्हे हाताळण्यामध्ये त्यांच्या हातखंड आहे.

श्री. गोरेगांकर यांचे सौंजन्यपूर्ण व नम्र स्वभावामुळे त्यांच्या जनसंपर्क अतिशय चांगला आहे. त्याचा फायदा त्यांना गुन्ह्याची उकल करण्यासाठी होत असल्याचे ते सांगतात.

आता त्यांना पोलीस दलातील सर्वोच्च असलेला गुणवत्तापूर्वक सेवेसाठी “राष्ट्रपती पोलीस पदक” देऊन सोमवारी २१ मार्च २०२२ रोजी सन्मानपूर्वक गौरवण्यात आले आहे. गणेश गोरेगांवकर हे सध्या गुन्हे शाखा प्रकटीकरण, कक्ष ३,मुंबई विभागात कार्यरत असून आतापर्यंत त्यांच्या कामगिरीचा चढता आलेख पाहता

त्यांची आपल्या कर्तव्य वरील निष्ठा, जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकता दिसून येते. गणेश गोरेगांवकर सांगतात त्यांनी मिळालेल्या यशाचे श्रेय आपली कुलदेवता, आई-वडील, कुटुंबीय, शुभेच्छुक, मित्र परिवार यांना दिली आहे.

त्यांच्या यशस्वी कामगिरीचा संपूर्ण रायगड जिल्ह्याला अभिमान वाटतो. त्यांची ही कामगिरी पुढील पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. गणेश गोरेगांवकर यांनी केलेल्या अभिमानास्पद कामगिरीने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

हे सुध्दा वाचा

Video : ‘कोरोना’ योद्ध्यांचे कार्य कौतुकास्पद : भगतसिंह कोश्यारी

शिवसेनेचा राज्यपालांवर हल्लाबोल, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजप प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वागतायत

देवेंद्र फडणविसांनी समाजवाद्यांवर साधला निशाणा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी