34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाची जोरदार हजेरी; रायगडसह पालघर, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड...

राज्यात पावसाची जोरदार हजेरी; रायगडसह पालघर, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट

जूनमध्ये पावसाने झलक दाखवली, पण मनासारखा पाऊस काही पडला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पेरणीची कामे खोळंबली आहेत, असे असताना जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली होती. अखेर अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या मुसळदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा:

विजय चौधरी कॅनडातील ‘वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स’ स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करणार

एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पवार, पटेल शरद पवारांचे मन वळवत होते

सलग दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वे सेवा विस्कळीत; हार्बर रेल्वेलाही फटका

मुंबई आणि ठाण्यात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तळ कोकणात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सोबतच मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी