महाराष्ट्र

हिंदू एकता फाल्गुन वद्य तृतीया हिंदू तिथी नुसार २८ मार्च रोजी साजरी करणार शिवजयंती

महाराष्ट्रासह नाशिक जिल्हा व शहरात हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ तिथीने शिवजयंती साजरी करणार आहे. शेकडो वर्षांपासून संपूर्ण हिंदू समाज शिवरायांची जयंती तिथी नुसार साजरी करत असून काल, आज आणि उद्या ही जयंती तिथी नुसार साजरी करणार आहेत.दरवर्षी संपूर्ण राज्यात हिंदू तिथीने शिवजयंती सर्व जुने नवीन मंडळे साजरी करत आले आहे. परंतु मागील काही वर्षांपासून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तारखेचा घोळ सुरू आहे. आपले सर्व सण हे तिथी नुसार साजरे केले जातात शिवराय पण आमच्या साठी देव असून त्यांची जयंती सर्व शिवभक्त फाल्गुन वद्य तृतीय या तिथी नुसार यंदा २८ मार्च २०२४ रोजी येणारी जयंती साजरी करणार आहेत.(Hindu Unity Falgun Vadya Tritiya to be celebrated on March 28 as per Hindu tithi)

म्हणून सर्व जुने नाशिक व शिवभक्त आपले दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीला साजरी करणार आहेत.

हिंदू एकता आंदोलन पक्ष नेहमी हिंदुत्व साठी समर्पित असून सर्व देशभक्ती कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथी तसेच सर्व सण उत्सव हे साजरे करीत असतात. त्यात शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तिथी नुसार येणारी शिवजयंती राज्यातील नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, सोलापूर, पुणे, धुळे यासह अनेक जिल्ह्यात साजरी होणार आहे. मागील दोन वर्ष कोरोना मुळे मिरवणूक काढता येत नव्हती परंतु यंदा हिंदु एकता भव्य दिव्य मिरवणूक पारंपरिक मार्ग वाकडीबारव येथून साधू संतांच्या साक्षीने सायंकाळी पाच वाजता काढणार आहे.

तसेच शहरातील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंग चौक, द्वारका सर्कल येथे सकाळी अकरा वाजता विविध मान्यवरांच्याउस्थितीत सालाबाद्रमाणे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करणार आहे. यात संपूर्ण चौकात भगवे ध्वज व पताका लावून भगवे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. आणि लायटिंग लावून संपूर्ण परिसर प्रकाशमय करण्यात येणार आहे. त्यासोबत आरोग्य शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप, शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहे. अशी महिती संस्थापक अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी दिली आहे.

हिंदू एकता नेहमी शिवजयंती दिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना आणि इतर महापुरुषाच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करते. असे करणारे हिंदू एकता आंदोलन पक्ष एकमेव उदाहरण आहेत. सर्वांनी तिथी नुसार येणारी शिवजयंती साजरी करावी असे आव्हान हिंदू एकता आंदोलन पक्ष करीत आहे.

यावर्षी तिथीनुसार शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी किरणसिंग पवार यांची निवड करण्यात आली आहे. यासोबत कार्याध्यक्ष अतुल रायसिंगे अनिल जाधव, उपाध्यक्ष किरण जाधव, खजिनदार प्रसाद बावरी विशेष कार्यकारी अधिकारी, मिरवणुक प्रमुख उमेश पाटील, सरचिटणीस स्वप्निल काथवटे, सनी अहिरे, राजू गाडगीळ विजय पवार, रोशन जाधव, सोनू कसबे, राजेश धुमाळ, बाळासाहेब थोरात, रोशन जाधव, देवा पवार, अभिजीत पवार, प्रेम पवार, भारत सदभैय्या, त्रिदेव सदभैय्या आदींची निवड करण्यात आली आहे. उत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक परिश्रम घेत आहे .

टीम लय भारी

Recent Posts

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

18 mins ago

राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं?

मै शेरनी हूं और लढना भी जानती हूं, हे वाक्य आहे नुकत्याच झालेल्या रायबरेली(Raebareli) येथील…

23 mins ago

गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; त्या प्रकरणाचा निकाल आला; बायकोचं पदही गेलं

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST…

42 mins ago

चर बाबत शासनाकडून अद्याप प्रतिसाद नाहीच;पाणी कपातीचे संकट कायम

उन्हाच्या वाढत्या झळांसोबतच नाशिककरांवर पाणी कपातीची ( Water crisis ) टांगती तलवार कायम आहे. त्यातच…

1 hour ago

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

14 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

14 hours ago