33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रIAS प्राजक्ता लवंगारे यांची बदली, उद्धव ठाकरे यांनी दिले मानाचे पद

IAS प्राजक्ता लवंगारे यांची बदली, उद्धव ठाकरे यांनी दिले मानाचे पद

टीम लय भारी

मुंबई :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी IAS प्राजक्ता लवंगारे यांची आज बदली केली आहे (IAS Prajakta Lawangare has been posted at Nagpur). नागपूरच्या विभागीय आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती ठाकरे सरकारने केली आहे.

प्राजक्ता लवंगारे सध्या मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून कार्यरत होत्या (IAS Prajakta Lawangare was Secretary of Marathi language department). गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अनेक IAS अधिकाऱ्यांच्या उचलबांगड्या केल्या होत्या.

IAS Prajakta Lawangare was Secretary of Marathi language department
IAS प्राजक्ता लवंगारे

नुसरत जहाँचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, कोणी आणि का केली ही मागणी

शरद पवार, प्रशांत किशोरांच्या दिल्लीतील भेटीनंतर ‘या’ चर्चांना उधाण

तब्बल 60 पेक्षा अधिक IAS अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हलविले होते. त्यात प्राजक्ता लवंगारे यांचाही समावेश होता (IAS Prajakta Lawangare was posted on secondary post by Uddhav Thackeray). लवंगारे यांना दुय्यम दर्जाचे मराठी भाषा विभागाचे सचिवपद दिले होते. पण आता त्यांचे चांगल्या जागेवर पुनर्वसन करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्तपद हे IAS लॉबीमध्ये मानाचे पद समजले जाते. हे पद मलईदार तर आहेच, पण मान, सन्मान व अधिकारसुद्धा या पदामुळे मिळतो असतो. पाच–सहा जिल्ह्यांची सर्व प्रशासकीय यंत्रणा विभागीय आयुक्ताच्या तालावर चालत असते. राजेशाही थाट मिरवता येतो (IAS Prajakta Lawangare posted on Nagpur Divisional commissioner).

मोठमोठाल्या कामांसाठी बड्या माशांना विभागीय आयुक्तांचा आशिर्वाद हवा असतो. त्यामुळे बडे मासे विभागीय आयुक्तांकडे कामे मार्गी लावून घेण्यासाठी धडपडत असतात. या उलट मराठी भाषा हे खाते अडगळीतील खाते समजले जाते.

जिम कॉर्बेट येथील ढिकाला झोन मधली रोमांचकारी टायगर सफारी

MP IAS officer row: Jangid replies to show cause notice, calls it ‘mala fide’

बिल्डर, धनाड्य व्यक्तींचे मराठी भाषेच्या खात्यात काहीच काम नसते. भाषा तज्ज्ञ, साहित्यिक, मराठी चळवळीतील कार्यकर्ते अशी सामाजिक भावना असलेले कार्यकर्ते तेवढे या खात्याच्या सचिवांना भेटायला येत असतात. त्या पार्श्वभूमीवर IAS लवंगारे यांना विभागीय आयुक्तपदाची लागलेली लॉटरी महत्वाची आहे.

उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांचा स्टॅम्प असलेल्या प्रवीण परदेशी, प्रवीण दराडे, आश्विनी भिडे, मिलिंद म्हैसकर, मनिषा म्हैसकर अशा अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या दुय्यम जागांवर केल्या होत्या.

नाराज झालेले प्रवीण परदेशी यांनी महाराष्ट्र सोडून परदेशात प्रतीनियुक्ती करवून घेतली. मिलिंद म्हैसकर यांनी ठाकरे यांची मर्जी संपादन केली. त्यामुळे त्यांची नुकतीच गृहनिर्माण खात्यात वर्णी लावण्यात आली आहे. त्यानंतर आता प्राजक्ता लवंगारे यांनाही मानाचे पद मिळाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी