33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउद्योगमंत्री सुभाष देसाईंची अनोखी योजना, बंद पडलेल्या उद्योगांना नवसंजीवनी देणार

उद्योगमंत्री सुभाष देसाईंची अनोखी योजना, बंद पडलेल्या उद्योगांना नवसंजीवनी देणार

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनामुळे अनेक लोकांचे उद्योग (Industry) बंद झाले. त्यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे लोक बेघर झाली आहेत. अशाच बंद झालेल्या उद्योगासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी अनोखी योजना सुरू केली आहे, बंद पडलेल्या उद्योगांना नवसंजीवनी देणार आहेत (Industry Minister Subhash Desai has launched a unique scheme to revive closed industries).

उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी (Subhash Desai) यांनी सुरू केलेल्या अभय योजनाचा लाभ सुक्ष्म, लघु, मध्यम वर्गवारीतील उत्पादक घटकांना लागू असेल. या योजनेद्वारे बंद पडलेल्या उद्योगांचे (Industry) पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी व्यक्त केला आहे.

मोदी है तो मुमकिन है, काँग्रेस नेत्याचा बोलबाला

नवनीत राणांचं खासदारकी पद धोक्यात, शिवसेनेचा जल्लोष

अभय योजनेसंबंधी उद्योगांच्या (Industry) सूचना समजून घेण्यासाठी आज सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या मंत्रालयातील दालनात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यात आली. त्यावेळी विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे, अंबरनाथ, तळोजा, अंबड, सिन्नर इत्यादी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी आणि औद्योगिक संघटनांनी भाग घेऊन काही सूचना केल्या. यामध्ये सिन्नर तालुका औद्योगिक सहकरी वसाहतीचे संचालक नामकर्ण आवारे, पिंपरी चिंचवड औद्योगिक संघटनेचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, विदर्भ औद्योगिक संघटनेचे सुरेश राठी, लघु, मध्यम उद्योग संघटनेचे प्रदीप पेशकार यांचा समावेश होता.

विविध उद्योजक संघटनांनी केलेल्या या सर्व सूचनांची दखल घेऊन नवी योजना तयार करण्यात यावी, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी विभागातील अधिकाऱ्यांना दिले. विशेष अभय योजनेमध्ये बंद असलेल्या उद्योग (Industry) घटकांकडे शासकीय देणी थकित असल्यास त्या रक्कमेवरील दंड आणि व्याज पूर्णपणे माफ करून औद्योगिक मालमत्ता नवीन खरेदीदारांकडे हस्तांतरित करण्यासाठी ही योजना सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी व्यक्त केला.

Bombay HC cancels caste certificate of MP Navneet Rana, says she got it fraudulently

यापूर्वी २०१६ मधील अशा अभय योजनेचा २८७ उद्योगांनी लाभ घेतला आहे. प्रस्तावित विशेष अभय योजना उद्योगस्नेही असेल. रोजगार गमावलेल्या कामगारांना या योजनेद्वारे रोजगार उपलब्ध होईल, देशातील इतर राज्य देखील या योजनेचे अनुकरण करतील, असा विश्वास सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी व्यक्त केला. आजच्या बैठकीला उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, सह सचिव संजय देगांवकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी