31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईमोदी है तो मुमकिन है, काँग्रेस नेत्याचा बोलबाला

मोदी है तो मुमकिन है, काँग्रेस नेत्याचा बोलबाला

टीम लय भारी

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण हेदेखील उपस्थित होते. मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी अशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (Prime Minister Narendra Modi) मागणी केली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) कायद्याला 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असा निर्णय दिला आहे; पण केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून ‘ईडब्ल्यूएस’ला ही मर्यादा ओलांडता येईल, अशी तरतूद केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मोदींची भेट घेतली आहे.

मराठा आरक्षणाची मर्यादा शिथील करावी; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

नवनीत राणांचं खासदारकी पद धोक्यात, शिवसेनेचा जल्लोष

“Not Like I Met Nawaz Sharif”: Uddhav Thackeray After Face-Time With PM

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. ‘मोदी है तो मुमकिन है’ असे म्हटले आहे. “मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 102 वी घटनादुरुस्ती व इंदिरा स्वाहनी प्रकरणातील 50 टक्के आरक्षण मर्यादा या मुद्द्यांमुळे पूर्णपणे केंद्राच्या आधीन आहे. संसदेत कायदाही होऊ शकतो. महाविकास आघाडी नेते भेटल्यावर मोदीजी निश्चित निर्णय घेतील. #मोदी_है_तो_मुमकिन_है” असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी