31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्र“राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल” रोहित पवारांचा अतुल भातखळकरांना टोला

“राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल” रोहित पवारांचा अतुल भातखळकरांना टोला

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोनामुळे रुग्णसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. “राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल” असा टोला रोहित पवारांनी अतुल भातखळकरांना लगावला (Rohit Pawar lashes out at Atul Bhatkhalkar).

“युतीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे (The toll has been imposed by Rohit Pawar). कोरोनाच्या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी केंद्रातील संसदभवानाच्या बांधकामावर टीका केली होती. त्याची दखल घेत अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी काही ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पवार यांनी वरील वक्तव्य ट्विटद्वारे केले.

गोंदवलेकर महाराज संस्थानचे ‘गिरे तो भी टांग उपर’

बाळासाहेब थोरातांचा कौतुकास्पद निर्णय, एक वर्षाचा पगार सीएम फंडात

Coronavirus: India reports highest single-day surge with 3,86,452 cases, 3,498 deaths in 24 hours

“युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते. आता ते फक्त उद्धवजींचे वडील?. भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,” असे रोहित पवार (Rohit Pawar) ट्विटद्वारे म्हणाले.

केंद्रासारखी जबाबदारी झटकली नाही

पुढे बोलताना त्यांनी राज्यात होणाऱ्या मोफत लसीकरणावरुन भातखळकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. “राज्याची स्थिती नाजूक असतानाही राज्याने लसीकरणाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारप्रमाणे लसीकरणाची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलली नाही,” असे रोहित पवार म्हणाले.

राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल

तसेच पुढे बोलताना सध्या राजकीय वक्तव्य करण्याची वेळ नाहीये. लोकांचे प्राण पणाला लागलेले आहेत, हे विसरु नये. त्यामुळे सध्या राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल, असा सल्लासुद्धा त्यांनी अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांना दिला.

अतुल भातखळकर काय म्हणाले ?

देशात कोरोनाचा कहर आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो आहे. पण देशात नव्या संसद भवनाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे प्राधान्य कशाला द्यावे याचा विचार करण्याची गरज आहे, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले होते. त्याला उत्तर म्हणून “मुख्यमंत्री 400 कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरत आहेत. त्यांना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लसीकरण महत्त्वाचे की काय हा प्रश्न विचारावा.

आपल्या गृहमंत्र्याने फक्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे असे म्हणतात. ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी,” अशी टिप्पणी अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली. दरम्यान, रोहित पवार आणि अतुल भातखळकर यांच्या या ट्विट वॉरमुळे राजकीय पटलावर अनेक चर्चा रंगल्या आहेत (The tweet war between Rohit Pawar and Atul Bhatkhalkar has sparked many discussions on the political stage).

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी