35 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब थोरातांचा कौतुकास्पद निर्णय, एक वर्षाचा पगार सीएम फंडात

बाळासाहेब थोरातांचा कौतुकास्पद निर्णय, एक वर्षाचा पगार सीएम फंडात

टीम लय भारी

मुंबई :- राज्यातील कोरोनाचे वाढते संकट आणि लसीकरणावर येणारा खर्च या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन सीएम रिलीफ फंडात देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे एक वर्षाचे मानधन देणार आहेत (Congress leader and revenue minister Balasaheb Thorat will pay the one-year honorarium).

तसेच महाराष्ट्र काँग्रेसकडून सीएम रिलीफ फंडात 5 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, तशी माहिती काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसेच आमच्या अमृत उद्योगातील पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च ही सीएम रिलीफ फंडात देणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले(Balasaheb Thorat said that the CM will contribute to the relief fund).

बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. देशात आणि राज्यात कोरोना संकटाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वेगवान पद्धतीने आणि वेळेत सर्व नागरिकांचे लसीकरण करणे हाच कोरोनावरील सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे.

मोठा भाऊ म्हणून मी पंकजासोबत, धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना भावनिक पाठींबा

देशात परिस्थिती गंभीर; आता भाजपचे पुढारी कोणाचे राजीनामे मागणार? सेनेचा सवाल

काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी व खासदार राहुल गांधी सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचे आवाहन केले. केंद्रात काँग्रेस पक्षाचे सरकार असताना अनेक लसीकरण मोहिमा राबविण्यात आल्या, परंतु त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसने फायद्या तोट्याचा विचार न करता जनतेच्या आरोग्याला महत्त्व देऊन मोफत लसीकरण केले हे सर्वांना ज्ञात आहेच.

सर्वांचे मोफत लसीकरण झाले पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वीचे लसीकरणही मोफत झाले आहे. त्यामुळे आम्ही ही मोफत लसीकरण करणार आहोत. यावर मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे मी माझे एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. काँग्रेसचे सर्व आमदारही त्यांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. तसेच महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निेधीला पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत, असे सांगतानाच सीएम रिलीफ फंडाला निधी देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले (Balasaheb Thorat appealed to the citizens to come forward to fund the CM Relief Fund).

How Covid-19 vaccination can be accelerated globally without suspending intellectual property rights

केंद्रातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने कोरोना संकटकाळात आपल्या जबाबदारीपासून पळ काढत लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधामुळे उद्योग, धंदे, व्यापारी आस्थापना बंद असल्याने अनेक राज्ये आर्थिक अडचणीत आहेत. अशावेळी राज्यांना मदत करणे तर दूरच राहिले केंद्र सरकार राज्याच्या हक्काचे पैसेही देत नाही.

अशा विपरित परिस्थितीतही काँग्रेस पक्षाच्या मागणीवर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने स्वागत केले असून कोरोना विरोधी लढ्याला बळ देण्यासाठी आपल्या परीने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही तरुण मंडळीही या विधायक कार्यात पुढाकार घेत आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जे नागरीक लसीकरणाचा खर्च स्वतः उचलू शकतात त्यांनी लसीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आवाहन केले आहे. तर मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक यांनी स्वतः आणि इतर पाच व्यक्तींच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे, त्यांच्या या भूमिकेचे मी कौतुक करतो.

कोरोना रूग्णांवरील उपचारांसाठी ऑक्सिजन, औषधे, वैद्यकीय उपकरणे अशा विविध गोष्टींची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेली ही मदत गरीब रूग्णांसाठी आवश्यक साम्रगी खरेदी करण्यासाठी उपयोगात येऊ शकते त्यामुळे राज्यातील इतर राजकीय पक्ष, सहकारी संस्था औद्योगिक आस्थापना यांनी आपल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे (Balasaheb Thorat has appealed to help the Chief Minister Assistance Fund in his own way).

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी