27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रEknath shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील 'मोस्ट हेट नेम!'; सामनातून मुख्यमंत्र्यांवर डागली...

Eknath shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील ‘मोस्ट हेट नेम!’; सामनातून मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे वर्तन सगळ्यात तिरस्करणीय ठरत आहे. महाराष्ट्रात शिंदे यांचे नाव ‘मोस्ट ऑफ हेट नेम’ ठरत आहे. अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा जोरदार प्रहार केला आहे. संसदेत ‘गोडसे’ हा शब्द असंसदीय ठरवला तसा ‘शिंदे’ शब्द महाराष्ट्रात तिरस्करणीय, असंसदीय ठरेल काय? , लखोबा लोखंडेस पर्यायी शब्द सद्याच्या शिंदेंचा होऊ शकतो. या घडीस महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे वर्तन सगळ्यात तिरस्करणीय ठरत आहे. महाराष्ट्रात शिंदे यांचे नाव ‘मोस्ट ऑफ हेट नेम’ ठरत आहे. इतर सर्व निष्पाप, कर्तबगार शिंद्यांची क्षमा मागून लिहावे वाटते, एका शिंद्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीरावर खंजीर खुपसून शिंद्यांच्या इतिसाहासाला, परंपरेला काळीमा फासला आहे! असा जोरदार प्रहार सामनाच्या रोखठोक मधून आज एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी शिवसेना कागदोपत्री संपवली!
शिंदे यांनी शिवसेनेत ऊभी फूट पाडल्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार खासदार शिंदेंनी आपल्या गोटात सामील केले. यावर देखील रोखठोकमधून प्रहार केला आहे. ‘सत्तार, भुसे, शिंदे, सामंत, आबीटकर, सरवणकर, कुडाळकर, सरनाईक, या टोळीने महाराष्ट्रावरच घाव घातला, शिवसेनेचे अस्तीत्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे नावाचे गृहस्थ आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आहेत, व ते सत्तेच्या बळावर प्रतिशिवसेना स्थापन करु पाहत आहेत. हे म्हणजे मोगलांत सामील झालेल्या एखाद्या गद्दाराने ‘शिवराय कोण? स्वराज्याचे खरे मालक आम्हीच!’ असा दावा करण्यासारखे आहे. दिल्लीतील राज्यकर्त्यांनी शिंदे आणि त्यांच्या ४० गारद्यांची मदत घेऊन शिवसेना कागदोपत्री संपविली. शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धनूष्यबाण गोठवले, महाराष्ट्राची कवचकुंडलेच शिंदे आणि त्यांच्य गारद्यांनी दिल्लीच्या चरणी अर्पण केली’, असा जोरदार हल्ला दिल्लीचे राज्यकर्ते आणि शिंदे गटावर केला आहे.

हे सुद्धा वाचा

Anil Deshmukh Hearing : ‘वसूलीचे आदेश अनिल देशमुखांनीच दिल्याचे वाझेंनी मान्य केलंय’ सीबीआयचा दावा

Prithviraj Sukumaran : सालारमधील सुपरस्टार पृथ्वीराजचा ​​फर्स्ट लुक आऊट! पाहा सुपर सिनेमाचा सुपर पोस्टर

Diwali Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारचे ‘दिवाळी गिफ्ट’; महागाई भत्त्यात 9 टक्क्याने वाढ

‘कारण भाजला ते हवे आहे’
दसरा मेळाव्यानंतर शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. मात्र महाप्रबोधन यात्रेतील नेत्यांवर गुन्हे दाखल होत असल्याने याचा देखील खरपूस समाचार या रोखठोकमधून घेतला आहे. रोखठोकमध्ये म्हटले आहे की, महाप्रबोधन यात्रेसाठी गेलेल्या शिवसेना नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांचा गुन्हा इतकाच की, त्यांनी ठाण्यातील मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांची नक्कल केली आणि लोकांनी या नकलांना दाद दिली. त्यामुळे शिंदे आणि त्यांचे सहकारी चिडले. मात्र राज्यकर्त्याने टीका सहन केली पाहिजे, संयम बाळगला पाहिजे. शिंदे यांच्यावर टीका करण्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आघाडीवर, पण शिंदे प्रतिहल्ला करतात शिवसेनेवर, कारण भाजपला ते हवे आहे.’ असा आरोप देखील भाजपवर या रोखठोकमधून केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी