30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रLatur Accident News : देव दर्शनाला निघालेल्या पाच जणांचा वाटेतच दुर्देवी अंत

Latur Accident News : देव दर्शनाला निघालेल्या पाच जणांचा वाटेतच दुर्देवी अंत

लातूर मध्ये एसटी बस आणि कारचा आज मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

राज्यात नवरात्रोत्सवाचा सण उत्साहात पार पडत आहे. सगळीकडेच जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत असून दसरा उद्यावरच आल्यामुळे सजावटीसाठी एकच रेलचेल पाहायला मिळत आहे. आनंदाच्या या वातावरणात लातूर येथील भीषण अपघाताने मात्र अनेकांचे मन सून्न करून टाकले आहे. लातूर मध्ये एसटी बस आणि कारचा आज मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मृत्यु झालेले सगळेच जण देवदर्शनासाठी निघाले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या अपघाताप्रकरणी स्थानिक पोलिस आणखी तपास करीत आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी होती की या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. उदगीर आगाराची बस प्रवाशांना उदगीरहून घेऊन चाकूरच्या दिशेने येत होती, तर स्विफ्ट कार ही तुळजापूरहून दर्शन करून उदगीरच्या दिशेने येत होती.

दोन्ही गाड्यांच्या चालकांना वेळीच अंदाज न आल्यामुळे लोहाऱ्याजवळील गुळगे मिलच्या जवळ एसटी बस आणि कार समोरासमोर एकमेकांना धडकले. दोन्ही गाड्यांची धडक एवढी जोरदार होती की या धडकेत कारचा पूर्ण चक्काचूर झाला, तर एसटी चालकाच्या बाजूचा एसटीचा भाग कापला गेला. या अपघातात पाच जणांचा दुर्देवी अंत झाला. देवदर्शन करून परतणाऱ्यांवर अशाप्रकारे काळाने घाला घातल्याने आता सगळीकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

Mumbai News : ‘कायदा मोडल्यास…’ दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Credit Card : गरजेच्या काळात क्रेडिट कार्ड वापरणे चांगले की वाईट? जाणून घ्या फायदे-तोटे एका क्लिकवर

Mumbai-Kolhapur Flight : अवघ्या ४० मिनीटांत कोल्हापूरातून मुंबईत; बहुप्रतिक्षित विमान सेवा आजपासून सुरू

अलोक तानाजी खेडकर (रा. संत कबीर नगर,उदगीर), अमोल जीवनराव देवक्तते (रा. रावनकोळा) कोमल व्यंकट कोदरे (रा. डोरणाळी ता मुखेड), यशोमती जयवंत देशमुख (रा. यवतमाळ), नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार (रा. बिदर रोड, उदगीर) असे मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे असून प्रियांका गजानन बनसोडे (रा. एरोळ ह. मु. गोपाळ नगर, उदगीर) ही महिला या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच उदगीर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली, यावेळी उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन व शहर पोलीस ठाण्याचे तसेच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सारेच जण घटनास्थळी दाखल झाले आणि त्वरीत याबाबतचा तपास सुरू केला. दरम्यान घटनास्थळीच पंचनामा करून जागीच मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत, तर गंभीर जखमी झालेल्या महिलेला सुद्धा तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी