महाराष्ट्र

राज्यात मद्यविक्री वाढली; सरकारच्या तिजोरीत १२ हजार ९५२.८२ कोटी रूपयांचा महसूल जमा

राज्यातील मद्यविक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत भर पडली आहे. राज्यातील मद्यपींकडून मद्याच्या खरेदीत वाढ झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाची कमाई वाढली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात नोव्हेंबर अखेरीपर्यंत ३२.८६ टक्के वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ९५२.८२ कोटी रूपयांचा महसूल जमा झाला आहे.

विभागाने सन 2021-22 च्या एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत 9748.96 कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. सन 2021-22 च्या तुलनेत यावर्षी महसूलात 32.86 टक्के वाढ झाली आहे. राज्यात एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 34 हजार 164 गुन्हे नोंदवण्यात आले. त्यामध्ये 28 हजार 66 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 106.15 कोटी रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर व नुकतेच निवृत्त झालेले उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे राज्यात मद्य निर्मिती, घाऊक विक्री, किरकोळ विक्री, अनुज्ञप्त्या देणे व त्यांची तपासणी करुन नियमन करणे, मद्यावरील कर गोळा करणे आदी कामे केली जातात. तसेच राज्यातील अवैध मद्य निर्मिती विक्री, वाहतूक, बनावट मद्य, परराज्यातून होणारी अवैध मद्याची तस्करी इ. विरुध्द सज्ज राहून महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करुन त्याचे उच्चाटन व नियंत्रणाचे कामकाज केले जाते. परवानगी नसताना मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात विभागातर्फे कारवाई केली जाते.

हे सुध्दा वाचा

युट्यूबवरच्या अश्लील जाहिरातीमुळे नापास झालो, आता ७५ लाख रुपये द्या, भरपाईची मागणी करणाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला दंड

सामाजिक न्याय विभागात लबाडीला ऊत; 100 रुपयांच्या कवितेचे पुस्तक 684 रुपयात, तरतूद नसताना 36 कोटींची खरेदी!

IAS भाग्यश्री बानायत यांची नाशिक अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून तक्रारदार तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. नागरिक तक्रार नोंदविण्यासाठी 18002339999 हा टोल फ्री क्रमांक, 022-22660152 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 8422001133 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधू शकतील.

त्याचप्रमाणे stateexcise.controlroom@gmail.com या ईमेलवर संपर्क करुन तक्रार किंवा माहिती देता येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. जर कुणाला अनधिकृत मद्य निर्मिती, मद्य विक्री व इतर बाबींची माहिती द्यायची असेल तर या ठिकाणी माहिती द्यावी, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

खलील गिरकर

Recent Posts

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

21 mins ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

39 mins ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

1 hour ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

3 hours ago

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

9 hours ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

9 hours ago