33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राचे दिल्लीश्वरांकडून कौतुक, पंतप्रधानांच्या तोंडून ठाकरेंचे गुणगाण

महाराष्ट्राचे दिल्लीश्वरांकडून कौतुक, पंतप्रधानांच्या तोंडून ठाकरेंचे गुणगाण

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या दोघांमध्ये फोनवर संभाषण झाले (Prime Minister Narendra Modi and Chief Minister Uddhav Thackeray had a phone conversation today on the backdrop of Corona).

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Prime Minister Narendra Modi and Chief Minister Uddhav Thackeray) या दोघांच्या फोनवरील संभाषणात राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मोदी-ठाकरे यांच्यातील फोनवरील चर्चेमुळे राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणाला गती येणार असल्याचे सांगितले जात आहे.

राजेश टोपेंनी लॉकडाऊनवाढीचे दिले संकेत

राजकीय डावपेचामुळे आत्मनिर्भर म्हणून घेणाऱ्या देशावर ही वेळ आली; शिवसेनेची मोदींवर खोचक टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Prime Minister Narendra Modi and Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यात सुमारे 15 ते 20 मिनिटे चर्चा झाल्याचे कळते. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रेमडेसिवीर इंजेक्शन्स, ऑक्सिजन, लॉकडाऊन, 18 वर्षांवरील व्यक्तिंचे लसीकरण आणि राज्यातील वाढत्या मृत्यूंवर पंतप्रधानांनी माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थिती पंतप्रधानांना (Prime Minister) अवगत करतानाच राज्यांच्या गरजाही पंतप्रधानांसमोर (Prime Minister) मांडल्याचे कळते.

Modi’s attempt to curb criticism, open discussion during pandemic is inexcusable, says ‘The Lancet’

राज्यात 18 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणात येणाऱ्या अडथळ्यांविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे (Prime Minister) माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालायने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मुंबई महापालिकेने केलेल्या प्लानिंगचे कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची ही चर्चा महत्त्वाची मानली जात होती. दोन्ही नेत्यांनी आज केलेल्या चर्चेचे आगामी काळात सकारात्मक परिणाम दिसून येतील, असे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

यावेळी मोदींनी महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी चांगला मुकाबला करत असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले. पंतप्रधान (Prime Minister) आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे (Prime Minister) आभार मानले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी