34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन? दोन दिवसांत घोषणा

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन? दोन दिवसांत घोषणा

मुंबई l कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी कोरोनाची लाट नव्हे, त्सुनामीची भीती असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार असल्याचं, राजेश टोपे Rajesh Tope यांनी म्हटलं आहे. लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं म्हटलं आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. कोरोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी संकट टळलेले नाही सांगताना त्यांनी रुग्णसंख्या वाढत असलेल्या शहरांचं उदाहरण दिलं होतं. तूर्त तरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

“बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार असल्याचं,” राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. “लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल.पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

राजेश टोपे यांनी यावेळी लग्न समारंभात २०० नागरिकांची संख्याही कमी करणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजेश टोपे यांनी करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत लवकरच बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाईल असं सांगितलं होतं.

“कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपनगरी रेल्वेसेवा सर्वासाठी सुरू करण्याचा राज्य सरकारचा सध्या कोणताही विचार नाही. राज्यात दिवाळी खरेदीसाठी व अन्य वेळीही बाजारपेठांमध्ये उसळत असलेली गर्दी, चौपाटय़ा, समुद्रकिनारे व अन्य पर्यटनस्थळी, सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी यामुळे करोना प्रसार वाढत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी