31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्र"ये मनोज जरांगे पाटील है कौन?" असं का म्हणाले मुख्यमंत्री?

“ये मनोज जरांगे पाटील है कौन?” असं का म्हणाले मुख्यमंत्री?

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. मराठा आरक्षनासाठि उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आज उपोषण सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षनासाठि उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी, (14 सप्टेंबर) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांचाशी झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी फळाचा रस घेऊन हे उपोषण मागे घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासाहि चर्चा केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधला.

मराठा अरक्षणाबाबतीत मुख्यमंत्री शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असतानाच मंत्रिमंडळातील काही मंत्रीही यावेळी उपस्थित होते. मंत्री रामकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत, गिरीश महाजन, संदीपान भूमारे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर हे यावेळी आंदोलनस्थली उपस्थित आहेत. गेल्या सतरा दिवसापासून जरांगे पाटील करत असलेल्या उपोषण मागे घेण्यासाठी हे मंत्री सतत प्रयत्न करत असल्याचे दिसत होते. आता, सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून शिंदे सरकारकडून आरक्षणाचा तिढा आता सुटेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या धाडसाचे कौतुक करत म्हणाले, “मी बाबाला सांगितलं तुझं पोरगं लय भारी आहे. तो स्वत:साठी नाही तर समाजासाठी लढतोय. मनोजला मी गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो. त्याने वैयक्तीक फायद्यासाठी कोणताही प्रश्न मांडला नाही. तो जेव्हाही मला भेटला तेव्हा त्याने मराठा समाजाबद्दल आग्रही भूमिका मांडली. मी मनोजचं मनापासून अभिनंदनही करतो. एखादं आंदोलन करणं, आमरण उपोषण करणं आणि जिद्दीने ते आंदोलन पुढे नेणं, त्याला या महाराष्ट्रात जनतेचा प्रतिसाद मिळणं या सर्व गोष्टी खूप कमीवेळा पाहायला मिळतात. पण ज्याचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असतो त्याच्यामागे जनता उभी राहते.”

“ओबीसींना मिळणाऱ्या सवलती मराठा समाजाला देण्यासाथी प्रयत्न चालू आहेत. रद्द झालेलं आरक्षण मिळावं ही सरकारची भूमिका आहे. मराठवाड्यातील ज्यांच्याकडे जुनी प्रमाणपत्रं असतील, नोंदी असतील, काहींकडे नसतील…त्यासाठीच आपण जस्टिस शिंदे कमिटी स्थापन केली. जस्टिस शिंदे कमिटी त्यावर काम करत आहे.”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास कसा आहे ते सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी त्यांना सांगितलं की तुमचा एक माणूस त्या कमिटीत दिला तर अधिक फायदा होईल. आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला हा चुकीचा होता त्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना निलंबीत केले असून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जात आहेत. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही.” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे ही वाचा 

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे! मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत काय म्हणाले वाचा..

मनोज जरांगे पाटील यांचे मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत उपोषण मागे; आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्या का?

Ias अधिकाऱ्याने सामान्य जनतेला मिळवून दिले ८३० कोटी

मुख्यमंत्र्यांनी सांगितला दिल्लीतला ‘तो’ किस्सा!

यावेळी उपस्थितांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घडलेला एक किस्सा सांगितला. “मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाची दखल उच्च न्यायालयानेही घेतली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच आंदोलन सर्वांपर्यंत पोहोचल आहे.”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“मी परवा दिल्लीत गेलो होतो असता तिथे मला “ये मनोज जरांगे पाटील है कौन?” असं विचारण्यात आलं. मी म्हटलं, “सामान्य कार्यकर्ता है.. ” तर म्हणाले, “उसने तो सबको हिला के रख दिया है”, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी