30 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरमहाराष्ट्रगणेशोत्सव 2023: पालिकेचा दणका मूर्तीविक्रेत्यांना! केल्या ५०० पीओपी गणेशमूर्ती जप्त..

गणेशोत्सव 2023: पालिकेचा दणका मूर्तीविक्रेत्यांना! केल्या ५०० पीओपी गणेशमूर्ती जप्त..

राज्यात गणपती उत्सव जवळ येत असतानाच नागपूर महानगरपालिकेनं चक्क ५०० पीओपी गणपती मूर्ती जप्त केल्या. पीओपी गणपती मूर्तीची विक्री आणि साठ्यावर नागपूर महानगरपालिकेने अगोदरपासूनच बंदी घातली होती. छुप्या पद्धतीने हा व्यवहार सुरू असल्याची कोण कोण लागतात नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी झडती घेत थेट ५०० पीओपी गणपती मूर्ती जप्त केल्या.
 गणपती उत्सव पर्यावरणपूरक गणपती मूर्तीने साजरा करावा ही मागणी पर्यावरणप्रेमींकडून दरवर्षी केली जाते. मात्र अद्यापही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कठोर उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. यंदाच्या वर्षी पती उत्सवात केवळ पर्यावरण पूरक गणपती मूर्ती वापरा, पीओपी गणपती मूर्तींवर बंदी आहे, असे नागपूर महानगरपालिकेने जाहीर केले होते.
नागपूर येथील शाहू मूर्ती भांडारच्या प्रशांत शाहू यांनी मोठया प्रमाणात पीओपी मूर्ती दुकानातील गोदामात आणून ठेवल्या होत्या. याबाबतीत नागपूर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. पालिकेच्या घनकचरा आणि उपद्रव शोध पथकाने गोदामावर दोन दिवसांपूर्वी छापा मारला. अधिकाऱ्यांनी मूर्ती जप्त करायला सुरुवात करताच मालकाने गोंधळ घालायला सुरुवात केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानं अखेरीस पोलिसांना बोलावण्यात आलं.
हे ही वाचा 
यावेळी कारवाईच्या प्रसंगी पारंरिक मूर्तिकार संघटनेचे आणि हस्तकला संघटनेचे कारागीरही उपस्थित होते. पालिका अधिकाऱ्यांना संबंधितांनीच माहिती पुरवल्याचा मालकाने आरोप करत शाब्दिक वाद घातला. या कारवाईत मालकाचे पाच लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. येत्या दिवसांत कारवाया अजून वाढतील अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी