32 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : मेटेंनी बोलावलेल्या बैठकीला दोन्ही राजेंनी मारली दांडी

Maratha Reservation : मेटेंनी बोलावलेल्या बैठकीला दोन्ही राजेंनी मारली दांडी

टीम लय भारी

पुणे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) पेच तसेच इतर समस्यासंदर्भात विविध संघटना तसेच नेत्यांमध्ये एकवाक्यात आणण्यासाठी पुण्यात आमदार विनायक मेटे यांनी पुढाकार घेत मराठा विचार मंथन परिषद आयोजित केली होती. या बैठकीला खा. छत्रपती संभाजीराजे तसंच खासदार उदयनराजे भोसले यांना निमंत्रण होतं. मात्र मेटेंनी बोलावलेल्या बैठकीला दोन्ही राजेंनी दांडी मारली. त्यामुळे मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून मेटेंना बैठक उरकावी लागली. (Both the kings were absent from the meeting called by Mete)

या बैठकीत एकूण 25 ठराव करण्यात आले. या ठरावांची अंमलबजावणी 31 ऑक्टोबरपर्यंत सरकारने करावी, अशी मागणीही विनायक मेटे यांनी केली. राज्यातील विविध भागातील प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीनंतर विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. बैठकीत एकूण 25 ठराव करण्यात आल्याची माहिती देताना या ठरावांची अंमलबजावणी 31 ऑक्टोबरपर्यंत सरकारने करावी, अन्यथा समाज रस्त्यावर उतरला तर परिणामांची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशाराही मेटे यांनी दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी