30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी अशोक चव्हाणांना पुढे करून सत्ताधारी गंमत...

Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी अशोक चव्हाणांना पुढे करून सत्ताधारी गंमत पहाताहेत

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची टीका

टीम लय भारी

जालना : मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात (Maratha Reservation) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना म्होरक्या करून सत्तेतील इतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी गंमत बघण्याचे काम केले, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. (The ruling party is making fun of Ashok Chavan in the Maratha reservation case says Raosaheb Danve)

राज्य सरकारने न्यायालयात आपली बाजू नीट मांडायला हवी होती. मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन वकिलांची फौज उभी करून आरक्षण टिकवायला पाहिजे होते, असे दानवे यांनी सांगितले.

दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने धरणे धरण्यात आले होते. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दानवे म्हणाले, की मराठा समाजास आरक्षण मिळावे, अशी भाजपची मागणी आणि स्पष्ट भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिलेली आहे. तामिळनाडूमधील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक असून या संदर्भातील प्रकरण पूर्ण पीठाकडे सोपवताना सर्वोच्च न्यायालयाने तेथील आरक्षणास स्थगिती दिलेली नाही. मराठा आरक्षणाचा विषय पूर्णपीठाकडे सोपविताना या आरक्षणास मात्र स्थगिती दिलेली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी