33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकर्जतच्या युवकाच्या निर्णयामुळे मराठा आंदोलकांचा मुद्दा राज्यात पुन्हा चर्चेत आला

कर्जतच्या युवकाच्या निर्णयामुळे मराठा आंदोलकांचा मुद्दा राज्यात पुन्हा चर्चेत आला

टीम लय भारी

कर्जत :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अंदोलनामध्ये राज्यातील अनेक मराठा युवकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे जोपर्यंत सरकार मागे घेत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार कर्जत मधील एका युवकाने केल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आला आहे (Maratha reservation has once again come up in the state as a youth from Karjat has decided not to wear sandals).

कर्जतमधील नितीन तोरडमल या युवकाने मराठा आरक्षणाच्या अंदोलनादरम्यान अनेक अंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पायात चप्पल न घालण्याचा निर्धार केला आहे. सरकार जो पर्यंत गुन्हे मागे घेणार नाही तो पर्यंत हा युवक समाजाच्या न्याय हक्कासाठी पायात चप्पल न घालत अनोखे अंदोलन सुरू ठेवणार आहे.

चाहत्यांच्या प्रेमाखातर अमृता खानविलकर आता यूट्यूबवर

बाळासाहेबांनी युंडूगुंडू विरोधी मोहीम हाती घेतली आणि शिवसेनेची स्थापना झाली

Maratha reservation
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अंदोलनामध्ये राज्यातील अनेक मराठा युवकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे जोपर्यंत सरकार मागे घेत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार कर्जत मधील एका युवकाने केल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आला आहे

याबाबत नितीन तोरडमल या युवकाने यावेळी बोलताना सांगितले की, मागील चार पाच वर्षामध्ये राज्यातील सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारची अंदोलने राज्यात केली आहेत. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या मराठा समाजाच्या अनेक शाळकरी मुले, काॅलेज तरूण तरूणी, युवक आणि कार्यकर्त्यावर सरकारने मोठया प्रमाणात गुन्हे दाखल केलेले आहेत. ते सर्व गुन्हे आज कोर्टात न्यायप्रविष्ट असून अनेकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने त्यांना शिक्षण, नोकरी व व्यवसाय यामध्ये अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासह वरील कारणामुळे त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे.

सफाईगाराची मुलगी, धुणी भांडी करणाऱ्या महिलेचा मुलगा जाणार परदेशी शिक्षणासाठी, धनंजय मुंडेंच्या निर्णयाचा फायदा

aharashtra Govt Postpones School Reopening Amid COVID-19 Fears

सरकारने अनेकवेळा मराठा अंदोकांनावरील गुन्हे मागे घेण्यासाठी खूप वेळा घोषणा करुन आश्वासने दिली आहेत. परंतु त्यावर ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गुन्हे तसेच प्रलंबित आहेत. पाठपुरावा करून देखील त्यावर काही तोडगा निघत नाहीये. त्यामुळे मराठा समाजाच्या अनेक अंदोलनामध्ये सर्वांबरोबर सक्रीय सहभाग असणारे बहिरोबावाडी (ता.कर्जत) येथील मराठासेवक नितीन तोरडमल या युवकाने ९ ऑगस्ट या क्रांती दिनापासून सरकारने न्यायालयातील सर्व गुन्हे प्रत्यक्षपणे मागे घेत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मराठा समन्वयक अँड. धनराज राणे यांनी प्रसिद्ध पत्रक काढत माहिती दिली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी