30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्र'रूप नगर के चीते' मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘रूप नगर के चीते’ मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

टीम लय भारी
मुंबई: अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुन्हा चित्रीकरण सुरू झाले आहे. अनेक मराठी सिनेमे चित्रीकरण पूर्ण करून, प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. ‘रूप नगर के चीते’ या मराठी सिनेमाचं पाहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती दिग्दर्शकांनी दिली आहे( Rup Nagar ke chite movie will be released soon).

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह आणि युवा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी या जोडीने केले आहे. एस एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली ‘ रूप नगर के चीते ‘ चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच रोमंचक आणि वेगळा अनुभव असणार चित्रपट आहे.

कर्जतच्या युवकाच्या निर्णयामुळे मराठा आंदोलकांचा मुद्दा राज्यात पुन्हा चर्चेत आला

बाळासाहेबांनी युंडूगुंडू विरोधी मोहीम हाती घेतली आणि शिवसेनेची स्थापना झाली

Rup Nagar ke chite
‘रूप नगर के चीते’ मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट(Rup Nagar ke chite) दोन बालमित्रांच्या रोमहर्षक प्रवासाबद्दल आहे. आयुष्यात घडलेल्या एका घटनेनंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधभासी जीवन दर्शवणारा आहे.

या चित्रपटातील अभिनेत्यांचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. मैत्रीतील कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू यात सादर करण्यात आले आहेत.

‘आघाडी सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये’

Reservations over inclusion of Marathas in OBC quota

अंतिम टप्प्यात आलेले हे चित्रीकरण पुणे आणि बंगळूर शहरात वेगाने सुरू आहे. या प्रोजेक्टवर काम करून आनंद आणि समाधान होत असल्याचे मनन शाह आणि विहाण सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी