33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रएमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा, नियुक्ती संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरवली बैठक

एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा, नियुक्ती संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरवली बैठक

मृगा वर्तक : टीम लय भारी

मुंबई :- गेल्या वर्षीच्या ताळेबंदीच्या काळात पुण्यातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन व आता स्वप्नील लोणकरची आत्महत्या. या अशा सतत होणाऱ्या प्रकरणानंतर एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न पुढे येत आहेत (Meeting convened by Ajit Pawar regarding MPSC appointment).

परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा पदावर नियुक्ती न झालेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती व्हावी हा प्रश्न घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठकीचे आयोजन केले. सदर बैठक आज मंत्रालयात 10.15 वाजता पार पडेल.

एमपीएससी बंद करा…

31 जुलै 2021 पर्यंत एमपीएसीच्या सर्व रिक्त जागा भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

या बैठकीला अनेक पदाधिकारी हजेरी लावतील. सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच राज्याचे मुख्य सचिव आणि त्याच बरोबर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ सुद्धा उपस्थिती लावतील.

कोरोना महामारीच्या पार्शवभूमीवर केल्या वर्षभरात महाराष्ट्र राज्य आयोगाच्या परीक्षांवर पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. परीक्षा सुद्धा सतत पुढची तारीख देऊन पुढे ढकलल्या जात होत्या. या रखडलेल्या परीक्षा व्हाव्यात म्हणून पुण्याच्या परीक्षार्थींनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. त्यानंतर रखडलेल्या मुख्य परीक्षा झाल्या. तसे होऊनही परीक्षेचा शेवटचा टप्पा मुलाखत मात्र अजूनही रखडली होती. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला. डोक्यावर कर्जाचा डोंगर, नोकरी नाही आशा परिस्थितीत मुलांचे मनोस्वास्थ्य खालावत आहे (A mountain of debt on the head, no job hope is deteriorating the mental health of children in the situation).

Meeting convened by Ajit Pawar regarding MPSC appointment
एमपीएससी

तुला आमदार मंत्री व्हायचं असेल तर बायकोवर लिंबू ओवाळून टाक

“Show Big Heart”, Slash Taxes On Fuel: Maharashtra Deputy Chief Minister To Centre

एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. जवळ जवळ 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यास त्यातून केवळ 15000 विद्यार्थी निवडले जातात, त्यानंतर मुलाखती दरम्यान संख्या अजून कमी होते. तुलनेत जागा फार कमी आहेत. ही ठराविक मुले हिरो होतात व बाकीची लाखो मुले आपल्या अपयशाचे कारण शोधत बसतात. यात त्यांची तारुण्यातली बरीच वर्षे वाया गेलेली असतात. त्यांचा आत्मविश्वास खलावतो. अशावेळी या परीक्षाच नको असे वाटते.

त्यामुळे आज मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न निकालात लागतात का व त्यांच्याबद्दल काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी