31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयएमपीएससी बंद करा...

एमपीएससी बंद करा…

ऍड. विश्वास काश्यप

आयुष्य उध्वस्त करणारी लाट…

तरुण-तरुणींच्या आयुष्यातील कोरोनापेक्षाही भयंकर, जीवघेणी आणि आयुष्य उध्वस्त करणारी कोणती लाट असेल तर ती आहे स्पर्धा परीक्षेची लाट. यूपीएससी एमपीएससी आणि अशा इतर अनेक जीवघेण्या स्पर्धात्मक परीक्षा (UPSC MPSC and many other such life threatening competitive exams).

कारकून बनविणाऱ्या फॅक्टरया…

हजारो-लाखो युवा युवतींचे मानसिक संतुलन बिघडविणाऱ्या या परीक्षा बंद करणे केव्हाही योग्य ठरेल. कारण या सर्व परीक्षा उच्च दर्जाचे कारकून तयार करण्याऱ्या फॅक्टऱ्या आहेत. साधा कारकून आणि आयएएस / उपजिल्हाधिकारी हे सुद्धा उच्च दर्जाचे कारकूनच की. फरक काही नाही (The IAS / Deputy Collector is also a high level clerk).

31 जुलै 2021 पर्यंत एमपीएसीच्या सर्व रिक्त जागा भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

ठाकरेंना दिलीप कुमारांच्या घरी जाण्यासाठी वेळ आहे, पण लोणकरच्या आईला भेटण्यासाठी नाही

९९-९९% नापास…

या परीक्षेला बसणाऱ्या युवक युवतींची आकडेवारी जर पाहिली तर थक्क होऊन जाल. परीक्षा तीन टप्प्यात होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि शेवटी मेरीट लिस्ट. एका पाहणीनुसार एमपीएससी पूर्वपरिक्षेकरिता एकूण 3,60,990 उमेदवार बसतात. त्यातील मुख्य परीक्षेला 6,825 उमेदवार पास केले जातात. त्यातील 1,326 मुलाखतीला येतात. त्यामधून 420 उमेदवारांची निवड होते. एकूण 3,60,570 उमेदवार नापास होतात. म्हणजेच 99-99 % उमेदवारांवर अपयशी म्हणून शिक्का मारला जातो.

भयंकर गुणोत्तर…

परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येकाला वाटते की तो उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस उपअधीक्षक होणार की ज्या पदांसाठी फक्त पन्नास ते शंभर इतक्याच जागा असतात. आपण फॉर्म भरणारे उमेदवार आणि उपलब्ध पदे यांचे गुणोत्तर पाहिल्यानंतर किती भयंकर परिस्थिती आहे हे आपल्या लक्षात येते.

विद्यार्थ्यांचा वर्गभेद…

आता ही जी विद्यार्थी मंडळी असतात त्यांच्यातही वर्गभेद हा सुरुवातीपासूनच तयार होतो. यूपीएससी करणारे विद्यार्थी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याला तुच्छ लेखतात. राज्यसेवा एमपीएससी करणारे विद्यार्थी साधी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याला तुच्छ लेखतात. म्हणजेच अभ्यास करतेवेळीच त्यांची एकमेकांबद्दलची तुच्छतेची भावना तयार होते आणि ती  निवृत्त होईपर्यंत तशीच राहते. नव्हे ती दिवसेंदिवस जास्त क्रूर होत जाते. एकाच लायब्ररीमध्ये बसून हे भावी अधिकारी एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत. तिथेही त्यांची गटबाजी तयार होते.

क्लासेसचा प्रचंड मोठा धंदा…

गेली कित्येक वर्षे यूपीएससी एमपीएससीच्या क्लासचा धंदा तुफान चालू आहे. जो तो उठतो आणि क्लास काढतो. क्लासचे पीक जोरात चालू आहे. असे क्लाससेस म्हणजे आजच्या तारखेचा सर्वात मोठा आर्थिक स्कॅम आहे. तरुणांना स्वप्नाच्या दुनियेत घेऊन जाऊन त्यांना अक्षरशः कफल्लक करण्याचे महापाप हे कोचिंगवाले करीत आहेत. त्या क्लास चालकांकडे ना सरकारचे लक्ष ना इन्कम टॅक्सवाल्यांचे. प्रचंड, प्रचंड पैसा आहे या तथाकथित क्लास संस्कृतीकडे. एमपीएससी साठी पुणे हे हब आहे तर यूपीएससीसाठी दिल्ली हे हब आहे. लाखोंची फी देऊन ना नोकरीची हमी ना सुरक्षित जीवनाची हमी. नुसतेच बोलबच्चन क्लाससेस.

रुपाली चाकणकरांची भाजप महिला नेत्यांवर टीका, दिलं उत्तर प्रदेशचं उदाहरण

Maharashtra: MPSC candidates’ stir against delay in recruitment process

पानभर जाहिराती…

एमपीएससी यूपीएससी परीक्षेचा निकाल लागल्यावर वर्तमानपत्राच्या संपूर्ण पान भरून आलेल्या करोडोच्या जाहिराती पहा.

धंदेवाईक दूरदृष्टी…

एका टॉपर विद्यार्थ्यावर चार ते पाच क्लासेसने केलेला दावा हा काय प्रकार आहे ? एक विद्यार्थी क्लास शोधत शोधत त्या क्लासच्या कार्यालयात जातो . त्याठिकाणी  गेल्या गेल्या त्याची व्यक्तिगत माहिती आणि फोटो घेतला जातो . मग त्या विद्यार्थ्याने त्या क्लासमध्ये ऍडमिशन घेऊ अथवा न घेऊ . लगेचच तो त्यांच्या क्लासचा तथाकथित अधिकृत विद्यार्थी होऊन जातो . तो जर मुलगा चुकून पास झाला तर तो आमच्या क्लासचाच विद्यार्थी आहे म्हणून क्लासवाल्याना भविष्यात जाहिरात करता यावी ही त्यामागची शुद्ध धंदेवाईक दूर “दृष्टी”!

श्रमाला कमी लेखणे…

गावागावातील, खेड्यातील मुले मुली शेती विकून, गहाण ठेवून क्लासची फी भरतात. सहा-सात वर्षे अभ्यासाची खर्डेघाशी करून त्यांना ‘स्व’ ची ओळख काही होत नाही. क्लासवाला आपला दरवर्षी लाखो रुपयांची फी घेतच असतो. आमच्या इथे मुलांना श्रमापेक्षा आरामदायक खुर्चीचेच जास्त आकर्षण असते, ओढ असते. आमच्या संस्कृतीत श्रम करणाऱ्याला जाणीवपूर्वक कमी लेखण्यात आले आहे.

खुराडी असलेल्या लायब्ररी…

खेड्यापाड्यातील मुले पुण्यासारख्या शहरात येतात. कोणत्यातरी चाळीत फ्लॅटमध्ये दाटीवाटीने राहतात. खुराड्यासारख्या असलेल्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतात. आर्थिक अडचणीमुळे कोणतेही पौष्टिक जेवण न घेता वडापाव किंवा स्वस्तात मिळणारा डबा घेऊन पोट भरतात. पुण्यातल्या अप्पा बळवंत चौक या भागात लायब्ररीचा नुसता सुळसुळाट झाला आहे. त्याची भरमसाठ फी. बऱ्याच लोकांनी त्यांच्या फ्लॅटचे रूपांतर लायब्ररीमध्ये करून हजारोंचा धंदा सुरू केला आहे. लाखो-करोडो रुपयांचा झेरॉक्सचा धंदा जोरात वाजत गाजत चालू आहे (Xerox multi-million rupee business is booming).

MPSC aspirant suicide: Family slams govt’s ‘negative’ approach, says son wouldn’t have died if interviews held on time

आयता पगार खाणारी मंडळी …

या कोरोनाच्या काळात यूपीएससी संपूर्ण देशात परीक्षा घेऊ शकते तर एमपीएससीला अशी कोणती धाड भरली आहे. गेली दोन-तीन वर्षे एमपीएससी बोर्डातील अधिकारी-कर्मचारी फुकटचा हजारो रुपयांचा पगार घेऊन खुर्च्या गरम करायला बसले आहेत का? तुमची कसली स्वायत्त संस्था हो? तुम्ही जर सरकारला जाब विचारू शकत नाही तर तुमचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फायदा काय? सरकारचे पोपट म्हणूनच काम करणार का (Will the government act as a parrot?)

बंद करा आता…

आमची महाराष्ट्र सरकारला एक नम्र विनंती आहे की हे एमपीएससी आयोग बंद करावे. सर्व उमेदवारांची कारकून या एकाच पदासाठी एकच परीक्षा घ्यावी. त्यानंतर त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार पदोन्नती देत रहावी. निवृत्त होईपर्यंत त्याला दोन तीन वर्षासाठी उपजिल्हाधिकारी करावे.

पोलीस भरती सुद्धा पोलीस शिपाया पासून सुरु करावी त्याच्या योग्यतेवर तो निवृत्त होईपर्यंत पोलीस अधीक्षक पदापर्यंत कसा जाईल याची आखणी करावी. त्या पदावर तीन चार वर्षे काम करू शकेल अशी व्यवस्था करावी.

इंग्लंडसारख्या देशात आयपीएस / डी.वाय.एस.पी. सारखे कोणतेही सरळ भरतीचे मोठे पद नाही. ते सरळ पोलीस शिपाई म्हणून भरती करतात. त्यानंतर त्याच्या गुणवत्तेवर तो पोलिस आयुक्त पदापर्यंत जातो ही त्यांची यंत्रणा आहे.

बिघडलेले सामाजिक संतुलन…

एमपीएससी यूपीएससी सारख्या जीवघेण्या स्पर्धेमुळे सामाजिक संतुलन बिघडत आहे. घरच्या दबावापोटी आणि सामाजिक स्टेटसपायी लाखो तरुण मुलामुलींचे आयुष्य बेचिराख होत आहे.

भ्रष्ट नोकरशाही…

एमपीएससी यूपीएससीच्या अधिकाऱ्यांनी असा काय दिवा लावला आहे की ज्याने राज्य आणि देश प्रगतीपथावर गेला आहे? देशात राज्यात हजारो लाखो अधिकाऱ्यांपैकी एखादाच टी. एन. शेषन, ज्युलियस रिबेरो, गो.रा.खैरनार इत्यादी यासारखे सामाजिक बांधिलकी असणारे अधिकारी तयार होतात. बाकी या ना त्या मार्गाने भ्रष्टच आहेत. आम्ही राजकीय नेत्यांना नावे ठेवतो की ही मंडळी किती भ्रष्ट आहेत. परंतु खरे भ्रष्ट ही नोकरशाही मंडळीच आहे. नोकरशाहीमुळेच देश भ्रष्ट झाला आहे .

प्रसिद्धीचा सोस…

आजचे आयएएस आयपीएस हे काही विचारायलाच नको. सगळे प्रसिद्धीला हपापलेले. एखादा आय ए एस बदली झाल्यावर दुसऱ्या विभागाचा चार्ज घेताना संपूर्ण मीडिया घेऊन जातो तर एखादा आयपीएस सतत मीडियाच्या संपर्कात राहून बोलबच्चन करून तरुणांना मार्गदर्शन करीत असतो. मूळ महत्वाचे सरकारी काम राहिले बाजूला.

निवृत्तीचे वय पन्नासच…

सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे असा आग्रह वर्षानुवर्षे त्यांच्या युनियनमार्फत चालू आहे. कशाला हवे निवृत्तीचे वय 60 वर्षे? आमचे स्पष्ट मत आहे की,  निवृत्तीचे वय ५० वर्षे करा. ५० वर्षापर्यंतच कामाचा जोश असतो. त्यानंतर तो अधिकारी / कर्मचारी निवृत्तीचे दिवस, महिने, वर्षे मोजण्यातच दिवस काढतो. आणि त्यालाच सरकारी काम म्हटले जाते. या स्टेजला आलेला कोणताही अधिकारी सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी संबंधित धडाकेबाज निर्णय घेत नाही. यांची बॅटिंग फक्त बॉल अडविण्यापूर्तीच. सामाजिक बांधिलकी असणाऱ्या चांगल्या निर्णयाचे चौकार-षटकार यांच्याकडून अपेक्षित नाही. मग कशाला खुर्च्या गरम करीत बसता? तुम्ही गेल्याशिवाय नवीन मुलांना नोकऱ्या मिळणार कशा? निवृत्तीचे वय पन्नास वर्षेच पाहिजे. प्रस्तुत लेखाच्या लेखकाने वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आहे याची कृपया नोंद घ्यावी.

UPSC MPSC and many other such life competitive exams
एमपीएससी

सरकारी नोकऱ्या कमी करा…

शासनाला आणखी एक विनंती कराविशी वाटते. आता सरकारी नोकऱ्या कमी करा. कितीही स्टाफ वाढविला तरीही सर्वसामान्य जनतेची सरकार दरबारी ज्या संथगतीने कामे होतात ती त्याच गतीने होणार आहेत.

जबाबदार कोण?…

राज्याच्या एकूण महसुलाच्या अर्ध्यापेक्षा जास्त वाटा हा पगार आणि पेन्शन यावरच खर्च होतो. कसला विकास आणि कसले काय? त्याच घाणीत जगतोय, त्याच रस्त्यावरील खड्ड्यात पडून जीव जातोय. या सर्व बजबजपुरीला जबाबदार असणाऱ्या उच्च अधिकाऱ्याचे काय जाते? काहीही नाही.

सर्वात सुखी पगारदार मंडळी…

कोरोनाच्या काळात सर्वात सुखी हीच पगारदार मंडळी आहेत. काम करा अथवा करू नका महिन्याला तुमच्या बँकेच्या खात्यात पगार न चुकता पडत आहे. तुम्ही तो पगार एटीएम सेंटरच्या बाहेर उभे राहून मस्त हसत हसत काढत आहात. तुम्हाला फक्त तुमच्या कुटुंबाची चिंता. देश, समाज गया भाड मे…

चुकलास मित्रा…

पुण्याचा स्वप्नील लोणीकर तू चुकलास मित्रा. तुझे व्यक्तिमत्व इतके हळवे आणि परिस्थितीला घाबरणारे असेल असे वाटले नव्हते. तुझी तर अधिकारी म्हणून निवड होणारच होती. आत्महत्येची मानसिकता असलेली व्यक्ती गरीब जनतेला कोणता न्याय देणार होती?  तुझ्या आत्महत्येचे आम्ही कधीही समर्थन करणार नाही. कारण तुझ्या अचानक जाण्याने तुझ्या घरच्यांचे काय हाल झाले असतील हे तुला कसे कळणार रे बाबा?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी