29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रराजू शेट्टी भाजपसोबत जाणार नाहीत, स्वाभिमानीकडून स्पष्टीकरण

राजू शेट्टी भाजपसोबत जाणार नाहीत, स्वाभिमानीकडून स्पष्टीकरण

टीम लय भारी

कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधून( mahavikas aaghadi) राजू शेट्टीहे (raju shetty) बाहेर पडून भाजपात प्रवेश करणार अशा प्रकारच्या बातम्या खोट्या असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार( anil pawar) यांनी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीकडे पाठ फिरवून भाजपप्रणीत एनडीएशी (BJP) हातमिळवणी करणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून पसरवल्या जातात. असले प्रकार करण्यामागे स्वाभिमानी शेतकरी संघटना( Swabhimani shetkari sanghtna) आणि चळवळ बदनाम करण्याचे कारस्थान दिसत आहे. मात्र या कारनाम्या मागे नेमके कोण आहे? याचा शोध सुर असल्याचेही पवार यांनी म्हंटले आहे.

स्वाभिमानीची यासंदर्भात कुणाशीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे जो काय निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय थेट कोल्हापूर (kolhapur) मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीमध्ये कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा आणि विचारणा करून केला जाणार असल्याचेही अनिल पवार यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना जरी सत्ताधारी महाविकास आघाडी मध्ये अस्वस्थ असली तरी याचा अर्थ असा होत नाही की आम्ही लगेच भाजप बरोबर जाणार ? महाविकास आघाडीची स्थापना होताना किमान समान कार्यक्रमावर आधारित निर्णय घेतले जातील, असे आश्‍वासन दिल्यामुळे स्वाभिमानी महाविकास आघाडी मध्ये सहभागी झाली होती. मात्र आमची सर्वच पातळ्यांवर निराशा झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार? हे वृत्त निराधार असल्याचे अनिल पवार(anil pawar) यांनी सांगितलं. महाविकास आघाडी मध्ये सहभागी होण्यापूर्वी भाजपबरोबर आम्ही गेलो होतो. त्यामुळे भाजपचा राज्यकारभारही आम्ही जवळून पाहिलेला आहे दिल्लीतील आंदोलनांमध्ये शेकडो शेतकऱ्यांचे (Indian farmers’ protest)बळी घेणाऱ्या भाजपच्या कारभारात गेल्या दोन वर्षांमध्ये अशी काय सुधारणा झाली आहे कि, आम्ही लगेच त्यांच्या बरोबर जावे, असा सवालही पवार यांनी केला आहे.

उसाची एफआरपी दोन टप्प्यांमध्ये देण्याच्या निर्णयाचं समर्थन महाविकास आघाडी कडून केलं जातंय. पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्ताना मिळालेली तुटकी आणि अपुरी मदत, विजेच्या थकबाकी संदर्भात महावितरणने केलेला लपंडाव, वीज पुरवठा, महापूर नुकसान भरपाई, पीक विमा, प्रोत्साहन अनुदान यासह काही मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या.मात्र आघाडीने आमची सर्व पातळ्यांवर निराशा केली आहे. त्यामुळे मविआ सरकारमधून बाहेर पडण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या ५ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत कठोर निर्णय घेतला जाईल, असे पवार म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यासंदर्भात कुणाशीही चर्चा झालेली नाही त्यामुळे जो काय निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय कोल्हापूर मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीमध्ये कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा आणि विचारमंथन करून केला जाणार असल्याचेही अनिल पवार( anil pawar) यांनी सांगितले.

हे सुध्दा वाचा 

महाविकास आघाडीवर का आहेत? राजू शेट्टी नाराज

राजू शेट्टींनी ‘महाविकास आघाडी’ सरकारला ठणकावले, आंदोलनाची केली घोषणा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी