30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रCovid19 : उद्धव ठाकरे : मोदी सरकारकडून धान्याचा तुटपुंजा पुरवठा, महाराष्ट्राकडून मात्र...

Covid19 : उद्धव ठाकरे : मोदी सरकारकडून धान्याचा तुटपुंजा पुरवठा, महाराष्ट्राकडून मात्र जास्त पुरवठा

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’च्या ( Covid19 ) संघर्षात लोकांच्या दैनंदिन पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी राज्य सरकारने केशरी शिधावाटपधारकांना गहू व तांदूळ अल्प दरात उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून मात्र केशरी धारकांसाठी काहीही धान्य मिळालेले नाही. केंद्राने फक्त तांदूळ दिले आहेत. हे तांदूळ विशिष्ट लाभार्थ्यांसाठीच आहेत. परंतु गरीब व मध्यमवर्गीयांसाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या तिजोरीतून मदत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

कोरोनाच्या ( Covid19 ) अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या माणूसकी हाच धर्म महत्वाचा आहे. त्यामुळे जात, पात, धर्म, परप्रांतीय असे कोणतेही भेद करू नयेत. अशा सगळ्या लोकांना सरकार मदत करीत आहे. शिवभोजन योजनेतून आता दररोज एक लाख लोकांना पाच रूपयांत जेवण मिळेल. आवश्यकता असेल तर ती संख्या आणखी वाढवू.

सरकारी यंत्रणेने विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अन्नछत्रे उभारली आहेत. त्या ठिकाणी दररोज ५ ते ५.५० लाख लोकांना एक वेळ नाश्ता व दोन वेळचे जेवण मोफत दिले जात आहे.

केंद्राने धान्य दिले आहे, मग ते वाटले का जात नाही, असा प्रश्न काहीजण विचारत आहेत. पण मी तुमचा गैरसमज दूर करतो. केसरी शिधापत्रकधारकांसाठी केंद्राने कोणतेही अन्नधान्य दिलेले नाही. ठराविक लाभार्थ्यांसाठी फक्त तांदूळ दिले आहेत. त्याचे वाटप सुरू झाले आहे.

आम्ही केसरी शिधावाटपधारकांनाही धान्य पुरवणार आहोत. ८ रुपयांत ३ किलो गहू व १२ रुपयांत २ किलो तांदूळ असा पुरवठा करणार आहोत. या केशरीधारकांना धान्य मिळायला हवे यासाठी मी नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. आम्हाला आधारभूत किंमतीने विकत धान्य दिले तरी चालेल. महाराष्ट्र सरकार ते खरेदी करायला तयार आहे अशीही मागणी मोदींकडे केल्याचे ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘कोरोना’मुळे ( Covid19 ) संपूर्ण जगातच हाहाकार उडाला आहे. सगळ्यांनाच गरजेच्या वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे. अमेरिका भारताकडे औषधांची मागणी करीत आहे. आपल्याकडे व्हेंटिलेटर्सची संख्या कमी आहे. परंतु देवाच्या दयेने त्यांची गरज अजून लागलेली नाही. कोरोना ( Covid19 ) रूग्णांची संख्या अटोक्यात आहे. ती पूर्ण शून्यावर आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.

महाराष्ट्रात काही कंपन्यांनी व्हेंटिलेटर्स बनवायला सुरूवात केली आहे. डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेले पीपीई किट कमी पडत आहेत अशा तक्रारी येत आहेत. हे किट सुद्धा मोठ्या प्रमाणात बनविली जात आहेत. परंतु त्यांना प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. ही सगळी काळजी घेऊनच आम्ही गरजेच्या वस्तू खरेदी करीत आहोत. औषधे मुबलक आहेत. आणखी निर्मिती केली जात आहे. सॅनिटायर्झची निर्मिती केली जात आहे.

राज्यातील ‘कोरोना’ ( Covid19 ) स्थितीचा आढावा आम्ही दररोज घेत आहोत. अधिवेशनानंतर आम्ही सगळे मंत्री अजून भेटलेलो नाही. परंतु फोनवरून एकमेकांच्या संपर्कात आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे टीमवर्क सुरू आहे.

सर्दी, खोकला व ताप ज्यांना असेल त्यांनी इतर रूग्णालयात जाऊ नका. प्रत्येक विभागात फिव्हर क्लिनिक सुरू करण्याच्या सुचना केल्या आहेत. तिथेच तपासणी करा.

आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची रूग्णालये सुरू केली आहेत. कोविड – १९ ची ( Covid19 ) सौम्य लक्षणे असलेल्या लोकांसाठी, तीव्र लक्षणांसाठी वेगळी हॉस्पीटल असतील. तिसऱ्या प्रकारचे हॉस्पीटल हे कोरोनाची तीव्र लक्षणे व हृदयविकरासारखे इतर आजार असणाऱ्या रूण्साठी असेल. तीन प्रकारची रूग्णालये व फिव्हर क्लिनिक अशी चार प्रकारची वर्गवारी केल्यामुळे एकमेकांना संसर्ग होण्याचा संभव टाळण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याच्या अनुषंगानेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवाहन केले. लष्करात मेडीकल कोअरमध्ये काम केलेले निवृत्त कर्मचारी असतील. ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे, पण काही कारणांमुळे त्यांना नोकरी मिळाली नाही. अशा लोकांनी या ‘कोरोना’ ( Covid19 ) युद्धात आम्हाला सहकार्य करावे. महाराष्ट्राला तुमची गरज आहे. आरोग्य यंत्रणेत काम करू इच्छित असणाऱ्या अशा लोकांनी [email protected] या ईमेलवर माहिती पाठवावी. त्यात तुमचे नाव, नंबर व संपर्काचा पत्ता पाठवा. अन्य लोकांनी इतर कोणत्याही कारणास्तव या ई-मेलवर माहिती पाठवू नये असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हा काळ ( Covid19 ) विषाणूच्या गुणाकाराचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. आतापर्यत १७ हजार चाचण्या झाल्या आहेत. त्यात ११०० रूग्ण ( Covid19 ) पॉझिटिव्ह आढळले आहेत. ६०० जणांना गंभीर लक्षणे नाहीत. उरलेल्यांमध्ये तीव्र लक्षणे आहेत. २६ जण अत्यवस्थ आहेत. ८० पेक्षा जास्त रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे.

‘कोरोना’चे ( Covid19 ) संशयित रूग्ण हॉस्पीटलमध्ये येण्याची आम्ही आता वाटत पाहात नाहीत. त्या ऐवजी स्वतःच घरी जाऊन त्यांची चाचणी करीत आहोत. चाचण्यांची संख्या वाढवली आहे. मुंबई व पुण्यात तर अधिक चाचण्यांची संख्या वाढविली आहे.

तुम्हा सगळ्यांना घरी बसून कंटाळा आला असेल हे मी समजू शकतो. पण त्याला इलाज नाही. घरातील वातावरण आनंदी ठेवा. वाहिन्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे कार्यक्रम पाहा. ज्यांना हृदयविकार, स्थूलपणा, मधुमेहाचा आजार आहे त्यांनी खाण्यावर बंधने ठेवा.

काल आम्ही व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे मंत्रीमंडळाची बैठक घेतली. आम्ही सगळेजण मास्क लावून बसलो होतो. अंतरही बरेच ठेवले होते. तुम्ही सुद्धा मास्क वापरला पाहीजे. हा ( Covid19 ) विषाणू कधी कुठून आपल्याकडे येईल हे सांगता येत नाही. मास्कसाठी दुकानात जाण्याची गरज नाही. हा मास्क घरच्या घरी तयार करता येऊ शकतो. मास्क म्हणजे छत्री नव्हे. हातात घेऊन सतत बाहेर जाऊ नका. स्वतःचा मास्क स्वतःच वापरा. डेटॉल टाकून पुन्हा त्याचा वापर करा. वापरलेला मास्क रस्त्यावर टाकू नका.

शिंकलेला व खोकलेला मास्क रस्त्यावर टाकला तर कोरोना संसर्ग होईल. वापरलेला मास्क सुरक्षित जागा बघून जाळून ती राख कचऱ्याच्या पिशवीत टाका, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Uddhav Thackeray :‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताई म्हटले, अन् भाऊच बोलतोय असे वाटले’

Coronavirus Pandemic : उद्धव ठाकरे यांना अनावृत्त पत्र

उद्धव ठाकरेंची दुपारी घोषणा, संध्याकाळी आदेश जारी

कोरोनाबद्दल WHO ने प्रसारित केलेली माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी