30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रनारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

टीम लय भारी

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातील फेरबदल आणि मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातुन नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर रात्री खातेवाटप जाहीर करण्यात आले (Narayan Rane took over as Union Minister).

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. रात्री खातेवाटप जाहीर केल्यानंतर राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे खाते पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे होते. गडकरींकडील हे ज्यादा खाते काढून नारायण राणे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे (This extra account from Gadkari has been removed and this responsibility has been given to Narayan Rane).

नवे आले जुने गेले; केंद्रीय मंत्रिमंडळात 43 नवे चेहरे तर जुन्या 12 चेहऱ्यांना डच्चू

संजय राऊतांच्या नारायण राणेंना शिवसेनेच्या भाषेत शुभेच्छा

In Maharashtra, BJP plays Narayan Rane card to check Shiv Sena

नारायण राणे हे फायटर नेते म्हणून ओळखले जातात. राजकारणात अनेक चढउतार पाहणाऱ्या या नेत्याने आपला दबदबा मात्र कायम राखला. ६९ वर्षीय नारायण राणे गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात असून केंद्रात मंत्री म्हणून काम करत असताना मात्र त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात पहिले स्थान पटकावणाऱ्या राणे यांचा राजकीय प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी