32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक शहर जाणार पुन्हा खड्ड्यात

नाशिक शहर जाणार पुन्हा खड्ड्यात

सन २०२३ च्या पावसाळ्यापूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांनी शहरातील खड्ड्यांची स्थिती पाहता नव्याने खोदकाम न करता तात्काळ रस्ते करा असे खडे बोल मनपाला सुनावले होते.त्यांनतर शहरात काही दिवसापूर्वी सर्वत्र रस्ते करण्यात आले मात्र आता पुन्हा नव्याने शहरात अनेक ठिकाणी खोडकामास सुरुवात झाल्याने शहर पुन्हा खड्डेमय होण्याची भीती आहे. तर दुसरीकडे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी मे अखेर पर्यंत खोदकाम परवानगी नाकारली होती असे असताना खोदकाम होत असल्याने नेमकी महापालिका ठेकेदार चालवतात की आयुक्त असा प्रश्न निर्माण झाला आहे.  शहरात गॅस पाईपलाईनसाठी शहरात एकूण २०५ किलोमिटरचा रस्ता खोदून त्यातून गॅस पाईपलाईन जाणार आहे. त्यासाठी सुमारे ८० किलोमिटर खोदकाम करण्यात आले आहे.

सन २०२३ च्या पावसाळ्यापूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांनी शहरातील खड्ड्यांची स्थिती पाहता नव्याने खोदकाम न करता तात्काळ रस्ते करा असे खडे बोल मनपाला सुनावले होते.त्यांनतर शहरात काही दिवसापूर्वी सर्वत्र रस्ते करण्यात आले मात्र आता पुन्हा नव्याने शहरात अनेक ठिकाणी खोडकामास सुरुवात झाल्याने शहर पुन्हा खड्डेमय होण्याची भीती आहे. तर दुसरीकडे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी मे अखेर पर्यंत खोदकाम परवानगी नाकारली होती असे असताना खोदकाम होत असल्याने नेमकी महापालिका ठेकेदार चालवतात की आयुक्त असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 शहरात गॅस पाईपलाईनसाठी शहरात एकूण २०५ किलोमिटरचा रस्ता खोदून त्यातून गॅस पाईपलाईन जाणार आहे. त्यासाठी सुमारे ८० किलोमिटर खोदकाम करण्यात आले आहे.
हे देखील वाचा
मागील दोन वर्षापासून शहरातील विविध मार्गावर गॅसच्या पाईपलाईनसाठी रिलायन्स व एमएनजीएल कंपनीकडून खोदकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी अद्याप काम पुर्ण झालेले नाही. गेल्या पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास होत झाल्यानंतर मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रारी गेल्यानंतर खोदकामांना ब्रेक लावले होते.
त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याच विषयासंदर्भात खडे बोल सुनावले होते. कधी घेता मनपा प्रशासनाने काही दिवसापूर्वीच शहरात अनेक ठिकाणी नव्याने रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. मात्र हा डांबरीकरणाचा आनंद काही दिवस देखील टिकला नाही. गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा शहरात अनेक ठिकाणी गॅस वाहिनीसाठी रस्ते खोदण्यात आल्याने काही महिन्यापूर्वी असलेली परिस्थिती पुन्हा जैसे थे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे
या बाबत महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी नव्याने कोणत्याही परवानगी या खोदकामासाठी दिलेल्या नाहीत ज्या परवानगी मागील वर्षी दिली आहेत त्या आधारे खोदकाम सुरू आहे नेमके किती किलोमीटर परिसरात खोदकाम केले जाईल आणि किती किलोमीटर परिसर पूर्ण झाल्या आहे याबाबत माहिती देण्यास असमर्थता दर्शवली.
गेल्या पावसाळ्यात नाशिक शहरातील रस्त्यांची वाईट अवस्था झाल्यामुळे टीकेचे धनी बनलेल्या महापालिकेच्या बांधकाम विभागाने एमएनजीएलसह खाजगी कंपन्यांना रस्ते फोडण्यासंदर्भातील दिलेली वाढीव मुदत मे २०२३ मध्ये संपुष्टात आली. त्यांनतर पुन्हा मुदतवाढ देण्याची केलेली मागणी बांधकाम विभागाने फेटाळली होती. एकीकडे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून नाशिक शहरात घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्यासाठी पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी खोदण्यात येत असलेल्या रस्त्यांमुळे गेल्या दोन वर्षांपासून नाशिककर त्रस्त आहेत. याआधी शहरात विविध मोबाईल कंपन्यांनी खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते त्यात आता एम एमएनजीएलने दोन वर्षांपासून गॅस पाईपलाईनच्या नावाखाली खोदायचे सत्र सुरू ठेवले असून अद्याप काम पूर्ण झालेले नाही तसेच याची मुदतही संपल्याचे नाशिक महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र आता पुन्हा खोदकाम सुरु झाल्याने महापालीका प्रशासन गप्प का असा सवाल उपस्थित होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी