वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शारीरिक हाल करु नये. त्याचप्रकारे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा जेवन करावे. एकदा जेवण करतांना ५५ मिनिटांच्या आत पोटभर जेवण करावे असे प्रतिपादन प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. के के वाघ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाळासाहेब वाघ यांचे
के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय तर्फे या उपक्रमाचे नववे पुष्प डॉ. जगन्नाथ दीक्षित हे “जीवनशैली बदलातून स्थूलता व मधुमेह निवारण ” या विषयावर कवी कालिदास कला मंदिर, शालिमार, नाशिक येथे ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान डॉ. अतुल वडगावकर यांनी भुषविले.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर संस्थेचे विश्वस्त मा. श्रीमती शकुंतला वाघ यांचे हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले की, सलग तीन महिने दिवसातून दोन वेळा जेवन केल्याने साधारण आठ किलो वजन कमी होऊ शकते. व मधुमेह नियंत्रणात येतो. तसेच जेवणात कार्बोहायड्रेटचे प्रमाण करुन प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असावे. हा सर्व डाएट डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या मार्गदर्शनाने सुरु केली असल्याचे सांगितले. ‘डाएट’चे उद्देश तुमचे इन्शुलिन नियंत्रणात ठेवणे, तुमच्या अन्नपचनाचे काम सुरळीत करणे हे आहेत. पचनक्रिया सुधारल्याने त्रासही होत नाही. आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट, प्रोटिन्स, फॅट या तीनही गोष्टींचा आवश्यकता असते. मात्र, आपण जास्त खाऊन ‘फॅट’ची निर्मिती करतो आणि ते हव्या त्या प्रमाणात वापरत नाही. त्यामुळे मधुमेह होतो, असेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रथिने हे अत्यंत आवश्यक पोषक तत्व आहे. हे स्नायू तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते आणि शरीराची ऊर्जा, सामर्थ्य वाढवते. याच्या सेवनाने हाडे, त्वचा, नखे आणि केस तयार होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास शरीर कमजोर होते. त्यामुळे केस गळायला लागतात, नखांची कमकुवतपणा आणि त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवू शकते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे वजन कमी होते आणि मुलांचा विकास बिघडतो.
कार्यक्रमाचे परिचय व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर यांनी तर सुत्रसंचालन स्वाती पवार यांनी केले. डॉ. सुनील कुटे यांनी कार्यक्रमाचे संयोजक म्हणून कामकाज पाहिले.