33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा सेविकांचे आंदोलन 

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा सेविकांचे आंदोलन 

आशा गट प्रवर्तक यांना मंजुर केलेल्या मागण्यांचा शासकीय अध्यादेश न काढल्यामुळे १२ जानेवारी पासून त्या राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत.त्यांनी बुधवारी आपल्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सुमारे ७५ हजार आशा व साडेतीन हजारापेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दि. १८/१०/२०२३ ते दि.०१/११/२०२३ या कालावधीत त्यांच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपाच्या पार्श्वभुमीवर संप काळात आरोग्य मंत्री यांनी दि. ०१/११/२०२३ रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे संपाच्या वाटाघाटीसाठी कृति त्तमितीसोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये अनेक आश्वासने देण्यात आली होती मात्र त्यांची पूर्तता करण्यात आली नाही म्हणून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आयटकचे राज्य सचिव राजू देसले यांनी सांगितले. 

आशा गट प्रवर्तक यांना मंजुर केलेल्या मागण्यांचा शासकीय अध्यादेश न काढल्यामुळे १२ जानेवारी पासून त्या राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत.त्यांनी बुधवारी आपल्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सुमारे ७५ हजार आशा व साडेतीन हजारापेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दि. १८/१०/२०२३ ते दि.०१/११/२०२३ या कालावधीत त्यांच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपाच्या पार्श्वभुमीवर संप काळात आरोग्य मंत्री यांनी दि. ०१/११/२०२३ रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे संपाच्या वाटाघाटीसाठी कृति त्तमितीसोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये अनेक आश्वासने देण्यात आली होती मात्र त्यांची पूर्तता करण्यात आली नाही म्हणून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आयटकचे राज्य सचिव राजू देसले यांनी सांगितले.
हे देखील वाचा
 या बैठकीत आरोग्य मंत्री यांनी आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु. २००० दिवाळीपूर्वी देण्यात येणार, आशा स्वंयसेविकांच्या मोबदल्यात रु.७००० ची वाढ, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.६२०० ची वाढ आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संप काळातील कामकाज पूर्ण केल्यास त्यांना संपकाळातील मोबदला देण्यात येईल आदी आश्वासन आरोग्य मंत्री यांनी दि.०१/११/२०२३ रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत कृति समितीला दिले होते.
आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संपकाळातील कामे पूर्ण केली आहेत. परंतु त्यांचा मोबदला कपात करण्यात आला आहे. तरी कपात केलेला मोबदला आशा स्वंयसेविका व गटप्रतर्वकांना अदा करण्याचे आदेश काढण्यात यावेत आदी मागणी साठी आंदोलन करण्यात आले.
ग्रॅच्युईटीबाबत न्यायालयाच्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना किमान १८ हजार ते २६ हजारांपर्यंत मानधन वाढ करावी, ती महागाई निर्देशांकाला जोडून त्यात वाढ करावी,

आहाराचा दर आठ रुपये असल्याने कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी त्यात वाढ होत आहे. तरी हा दर सर्वसाधारण बालकाला १६ रुपये व अति कुपोषित बालकाला २४ रुपये असा करण्यात यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतनश्रेणी, भविष्यनिर्वाह निधी, सामाजिक सुरक्षांचा लाभ देण्यात यावा. सेवा समाप्तीनंतर मृत सेविका मदतनिसांना एकरकमी लाभ त्वरित देण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या

यावेळी आयटक राज्य सचिव राजू देसले, माया घोलप,सुवर्णा मेतकर,अर्चना गडख,ज्योती खरे,कविता गवई,वैशाली देशमुख,अरुणा आव्हाड,सुश्मा वटारे,सायली महाले,प्राजक्ता कापडणे, वैशाली कवडे, सविता अहीरे, अलका भोये, सुनिता कुलकर्णी, लक्ष्मी पगारे आदी आंदोलनास उपस्थीत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी