31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीचा शिवसेनेला इशारा, शरद पोंक्षेंच्या उमेदवारीला कडाडून विरोध

राष्ट्रवादीचा शिवसेनेला इशारा, शरद पोंक्षेंच्या उमेदवारीला कडाडून विरोध

टीम लय भारी

मुंबई : विधानपरिषदेसाठी अभिनेते शरद पोंक्षे यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे ( NCP opposed to Shivsena ).

‘शरद पोंक्षे केवळ कलावंत नसून विषारी विचारांचा पूर्णवेळ प्रचारक आहे. नथूराम त्याच्या नसानसांत आहे. त्याला विरोध आहे’ असे ट्विट राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केले आहे ( NCP Spokesperson Vikas Lawande attacks on Sharad Ponkshe ).

विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ जागांची नेमणुक प्रक्रिया सुरू आहे. या १२ जागा नेमणुकांबाबत गुरूवारी मंत्रीमंडळाने प्रस्ताव पारीत केला आहे. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना प्रत्येकी चार जागां देण्यात आल्या आहेत ( Vidhanparishad 12 seats appointment process going on ).

तिन्ही पक्षांकडून उमेदवारांच्या नावांबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. तरीही अनेक उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा सुरू आहे. या १२ जागांवर कला, साहित्य, समाजसेवा व सहकार या क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्तींची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

परंतु गेली अनेक वर्षे राजकीय क्षेत्रातीलच व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या जात आहे. विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ‘महाविकास आघाडी’ सरकारला सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे १२ जागांसाठी राजकीय व्यक्तींची शिफारस केली तरी राज्यपाल ती मान्य करण्याची शक्यता नाही ( Governor Bhagatsingh Koshyari against Mahavikas Aghadi Government ).

त्यामुळे तिन्ही पक्षांनी कला, साहित्य, सहकार, सामाजिक कार्य अशा क्षेत्रांतील लोकांच्याही शिफारशी केल्याची चर्चा आहे. शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांची शिफारस केल्याची चर्चा सुरू होती. अशातच शरद पोंक्षे यांच्याही शिफारसीची चर्चा सुरू झाली आहे.

शरद पोंक्षे हे अभिनेते असले तरी त्यांचा अभिनय सतत वादग्रस्त राहिलेला आहे. ‘मी नथूराम गोडसे बोलतोय’ या नाटकामुळे त्यांचा कट्टर हिंदूत्ववादी व गांधीद्वेष्टा चेहरा जनतेच्या समोर आला होता. विविध व्याख्याने, मुलाखतींमधूनही पोंक्षे नथूराम गोडसेंची भलामण करताना दिसतात. त्यामुळे पोंक्षे हे नेहमीच बहुजन व निधर्मी विचारसरणीच्या लोकांमध्ये टीकेचे धनी ठरले आहेत ( Sharad Ponkshe is a controversial actor ).

त्या पार्श्वभूमीवर पोंक्षे यांना शिवसेनेकडून तिकीट देण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीने लगेचच विरोधाचे अस्त्र उपसले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी