31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकच्या स्टार्टअपमध्ये बिझडेटअपची गुंतवणूक

नाशिकच्या स्टार्टअपमध्ये बिझडेटअपची गुंतवणूक

बिझडेटअपची नवकल्पना आणि उद्योजकता वाढवण्याची वचनबद्धते चा एक भाग म्हणून कंपनी द्वारे नाशिकमधील पी. आर.डी .एल (पॅसेंजर ड्रोन रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड) या स्टार्टअप्समध्ये धोरणात्मक गुंतवणुक केली आहे.भारताने गेल्या दशकात स्टार्टअप निर्मिती आणि त्यासाठी उपलब्ध गुंतवणुकीत उल्लेखनीय वाढ पाहिली असून, नावीन्य आणि उद्योजकतेचे जागतिक केंद्र म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. 2023 मध्ये, भारतात एकूण $8.4 अब्ज निधी ची गुंतवणूक स्टार्टअप मध्ये करण्यात आली आहे. हे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे ठोस समर्थन दर्शवते. प्रामुख्याने बंगळूरू हे देशातील स्टार्टअप हब राहिले असून आजपर्यंत एकट्या बंगळूरू ला एकूण $७०.४ अब्ज डॉलरचा निधी प्राप्त झाला आहे.

परंतु अलीकडील अहवालांनुसार, टियर 2 आणि टियर 3 शहरे स्टार्टअप इकोसिस्टममधील महत्त्वपूर्ण शहरे म्हणून उदयास येत आहेत. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटरनल ट्रेड (DPIIT) नुसार 31 डिसेंबर 2023 पर्यंत नोंदणीकृत 115,000 स्टार्टअप्सपैकी 50 टक्क्यांहून अधिक स्टार्ट अप हे टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये आहेत.(BizdetUp invests in Nashik-based startup)

विविध क्षेत्रातील वाढ आणि उदयोन्मुख ट्रेंड

इंटरनेट ची विस्तारित सुविधा, डिजिटायझेशन आणि शासकीय पुढाकारामुळे विविध क्षेत्रांनी 2014 ते 2023 पर्यंत भरीव वाढ अनुभवली आहे. या क्षेत्रांमध्ये रिटेल, एंटरप्राइझ ॲप्लिकेशन्स, फिनटेक, ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक टेक, फूड अँड ॲग्रीकल्चर टेक, ऑटो टेक, ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी टेक आणि एडटेक यांचा समावेश आहे, जसे Tracxn च्या अहवाला मध्ये नमूद करण्यात आले आहे .

याव्यतिरिक्त डीपटेक, स्पेसटेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ईव्ही सारख्या नवीन क्षेत्रांनी स्टार्टअप क्षेत्राचा विस्तार केला आहे. डीपटेक क्षेत्रातील निधी 2022 मध्ये $2.1 अब्ज इतका वाढला, तर ईव्ही उद्योगाला गेल्या दशकात $4.8 अब्ज निधी मिळाला. खाजगीकरणानंतर स्पेस टेक क्षेत्राने देखील गुंतवणूक दाराना आकर्षित केले आहे. स्पेसटेक क्षेत्रात निधी देण्याच्या बाबतीत भारत सातव्या क्रमांकावर आहे.

टियर 2 शहरांचा उदय: स्टार्टअप हब म्हणून नाशिकचा उदय

भारतातील टियर-2 शहरे झपाट्याने स्टार्ट अप केंद्र म्हणून उदयास येत आहेत, या मध्ये नाशिक हे नवे टेक डेस्टिनेशन म्हणून उदयास येत असून नाशिक ची वाटचाल या टियर 2 शहरांमध्ये नवे स्टार्टअप हब म्हणून होत आहे. या परिवर्तनाचे नेतृत्व बिझडेटअप टेक्नॉलॉजी करत असून या मार्फत देशभरातील अनेक टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील स्टार्टअप्समध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे.

नाशिकच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये बिझडेटअपची धोरणात्मक गुंतवणूक
बिझडेटअपची नवकल्पना आणि उद्योजकता वाढवण्याची वचनबद्धते चा एक भाग म्हणून कंपनी द्वारे नाशिकमधील पी. आर.डी .एल (पॅसेंजर ड्रोन रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड) या स्टार्टअप्समध्ये धोरणात्मक गुंतवणुक केली आहे. पी. आर.डी .एल ही कंपनी एरोमेघ ( AeroMegh) हे सॉफ्टवेअर निर्मिती करत असून हा सर्व्हिस (SaaS) प्लॅटफॉर्म ड्रोन डेटाचे कृती करण्यायोग्य अंतर्दृष्टीत रूपांतर करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, या मुळे वापरकर्त्यांना वेळ आणि पैसा यासारख्या संसाधनांना ची बचत होईल .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी