31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपस्तीस कोटींचा खर्च देण्यास शासनाचा नकार ; मनपाच्या खिशाला झळ

पस्तीस कोटींचा खर्च देण्यास शासनाचा नकार ; मनपाच्या खिशाला झळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) यांच्या उपस्थितीत मागील जानेवारी महिन्यात नाशकात झालेल्या राष्ट्रिय युवा महोत्सव स्पर्धेसाठी महापालिकेने तब्बल पस्तीस कोटी ( 35 crore )खर्च केले. हा खर्च शासनाने द्यावा यासाठी पत्रव्यवहारही केला. परंतू शासनाने कोणताही प्रतिसाद दिला नसून हा खर्च मनपाला स्वत:च्या तिजोरीतून करावा लागणार आहे. एक प्रकारे नाशिककरांच्या कररुपी पैशांची मनपा प्रशासनाकडून ठेकेदारांवर खैरात केली जाणार अाहे. मागील जानेवारी महिन्यात २७ व्या राष्ट्रिय युवा महोत्सवासाचे तपोवन मैदानावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. त्यांच्या दौर्‍यामुळे महापालिका यंत्रणेने सर्व शहर चकाचक करुन दिवाळीसारखे सजवले होते.(Govt refuses to pay Rs 35 crore The bmc’s pocket)

त्यासाठी नेहमीच्या तुलनेत ठेकेदारांकडून सढळ हाताने कामे करण्यात आली.त्यात प्रामुख्याने दुभाजक रंगरंगोटी व सुशोभिकरण, तपोवन परिसरात पार्किंग उभारणे व जमीन सपाटिकरण करणे, पुलांची दुरुस्तीसह रंगरंगोटी, रिंगरोडचे अस्तरीकरण, दिशादर्शक फकल, कॅटआय बसवणे, थर्मोप्लास्टिक पेंट मारणे, रोड मार्कर, साईन बोर्ड बसवणे, गोदा घाट डागडुजी व रंगरंगोटी, वस्त्रांतर गृह दुरुस्ती व डागडुजी, सभास्थळी बॅरेकडींग, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व स्वच्छता करणे, काळा राम मंदिरात मंडप, पडदे, ग्रीन कार्पेट टाकणे, मंदिरासमोरील उद्यानाची दुरुस्ती, शहरातील भिंतीवर रामायणाचे देखावे रेखाटने, महत्वाच्या रस्त्याचे अस्तरीकरण, खडिकरण, फुटपाथ दुरुस्ती व सजावट अशी विविध कामे करण्यात आली.साधारणत: या कामांवर पस्तीस कोटी इतका वारेमाप सढळ हाताने खर्च झाला आहे. महासभेच्या मान्यतेने हा खर्च शासनाने द्यावा अशी मागणी मनपाने केली होती. त्यास दोन महिने लोटले असून अद्याप शासनाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. एकप्रकारे शासनाने खर्च देण्यास नकार दिल्यास हा सर्व खर्च मनपाने स्वत:च्या तिजोरीतून करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठेकेदारांची दिवाळी
पंतप्रधान मोदीं येणार म्हणून महापालिकेने शहर सजवले. परंतू त्यासाठी झालेल्या खर्चाचे आकडे पाहून डोळे पांढरे होतील अशी परिस्थिती असून ठेकेदारांनी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच दिवाळी साजरी होणार आहे.

त्यात प्रामुख्याने साईन बोर्ड बसवणे, गोदा घाट डागडुजी व रंगरंगोटी, वस्त्रांतर गृह दुरुस्ती व डागडुजी, सभास्थळी बॅरेकडींग, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व स्वच्छता करणे, काळा राम मंदिरात मंडप, पडदे, ग्रीन कार्पेट टाकणे, मंदिरासमोरील उद्यानाची दुरुस्ती, शहरातील भिंतीवर रामायणाचे देखावे रेखाटने, महत्वाच्या रस्त्याचे अस्तरीकरण, खडिकरण, फुटपाथ दुरुस्ती व सजावट अशी विविध कामे करण्यात आली.साधारणत: या कामांवर पस्तीस कोटी इतका वारेमाप सढळ हाताने खर्च झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी