32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयमाढ्यात घडामोडींना वेग; शरद पवारांनी भाकरी फिरवल्याची चर्चा; भाजपच्या गोटात खळबळ

माढ्यात घडामोडींना वेग; शरद पवारांनी भाकरी फिरवल्याची चर्चा; भाजपच्या गोटात खळबळ

भाजपवर नाराज असलेले धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी भाजपविरुद्ध दंड थोपटवत पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले मोहिते-पाटील यांनी अखेर भाजपची साथ सोडली. दरम्यान, काल झालेल्या एका सभेत शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्यासंदर्भात मोठी घोषणा केली अन् मोहिते पाटलांनी मोठा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. (Dhairyasheel Mohite Patil Resignation From Bjp Party Enter Ncp Sharad Pawar Group)

धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच शरद पवारांचीही भेट घेतली होती. येत्या 14 तारखेला धैर्यशील मोहिते-पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. मात्र, कोणतीही अपेक्षा न ठेवता मोहिते पाटील पक्षात प्रवेश करणार आहेत. तसेच, जयंत पाटील यांच्या उपस्थित त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली. त्यांच्या या घोषणे नंतर आज मोहिते पाटील यांनी पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

पस्तीस कोटींचा खर्च देण्यास शासनाचा नकार ; मनपाच्या खिशाला झळ

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मोहिते पाटील यांनी राजीनामा पत्र लिहिलं आहे. मात्र, भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

काय म्हटलं आहे पत्रात?

मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची माझ्याकडे जबाबदारी आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडळ कार्यकारिणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटना रचना गठीत करुन कार्यान्वित करण्याचं कार्य केलं. तसंच शक्तीकेंद्र, सुपर वॉरीयर, बूथ रचनाही सक्रिय केल्या. वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करुन संघटना व बूथच्या माध्यममातून जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले.

आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो व आपणांस कळवू इच्छितो की मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती

आपला
धैर्यशील मोहिते पाटील

————————–

शरद पवारांनी संधी साधली

भाजपने जेव्हा लोकसभेसाठी महाराष्ट्राची पहिली यादी जाहीर केली तेव्हा पहिल्याच यादीत माढा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला. या उमेदवारीवरुन अकलूजच मोहिते पाटील नाराज झाल्याच्या चर्चा सुरु झाली. त्यानंतर मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. तसेच, गेल्या महिन्यात मोहिते-पाटिल आणि शिरूरचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट झाली होती. या दोन नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

त्यानंतर भाजपवर नाराज असलेले मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार हे निश्चित झालं. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात शरद पवारांनी भाकरी फिरवल्याची चर्चा सुरु झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी