उत्तर महाराष्ट्र

मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाणून घ्या

मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून पहिली मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस रवाना केली. या ट्रेनचे तिकीट बुकिंग, भाडे, वेग हा सर्व तपशील आपण जाणून घेऊया.

मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन देशाची व्यापारी राजधानीला असलेल्या मुंबईला महाराष्ट्रातील नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि साईनगर शिर्डी या तीर्थक्षेत्रांशी जोडेल. या देशातील दहाव्या वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा शनिवारी, 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. मुंबई-शिर्डी मार्गावर ही गाडी दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. ही गाडी मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. ही ट्रेन 16 डब्यांची असून ती सरासरी 64.35 किमी प्रति तास वेगाने धावेल. 22223 अप आणि 22224 डाऊन असे या गाडीचे क्रमांक असतील.

ही गाडी मुंबईहून नाशिक हे अंतर फक्त अडीच तासात पार करेल. पुढे नाशिक ते शिर्डीसाठी मात्र पावणेतीन तास लागतील. त्यामुळे मुंबई ते शिर्डी हे अंतर कापायला सव्वापाच तास लागतील. ही ट्रेन मुंबई सीएसएमटी स्थानकातून सकाळी सहा वाजून 20 मिनिटांनी सुटेल. 6.30 दादर, 6.49 ठाणे, 6.57 नाशिकरोड आणि 11 वाजून 40 मिनिटांनी ती शिर्डीत पोहोचेल. शिर्डीहून सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी निघून रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. नाशिकरोड 7.25, ठाणे रात्री 10.05 आणि दादर 10.28 अशा या गाडीच्या पोहोचण्याच्या वेळा आहेत. मुंबई सीएसएमटी ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे आरक्षण सुरू झाले आहे. देशभरातील कोणत्याही तिकीट बुकिंग काउंटरवरून किंवा IRCTC द्वारे या गाडीचे तिकीट बुक केले जाऊ शकते.

22223 मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे –

AC चेअर कार (CC) भाडे :

  • सीएसएमटी ते साईनगर शिर्डी – रु. 975
  • सीएसएमटी ते दादर – रु. 365
  • सीएसएमटी ते ठाणे – रु. 365
  • सीएसएमटी ते नाशिकरोड – रु. 720

एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) भाडे :

  • सीएसएमटी ते साईनगर शिर्डी – रु. 1,840
  • सीएसएमटी ते दादर – रु. 690
  • सीएसएमटी ते ठाणे – रु 690
  • सीएसएमटी ते नाशिकरोड – रु. 1,315
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक

22224 साईनगर शिर्डी-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे –

AC चेअर कार (CC) भाडे :

  • साईनगर शिर्डी ते सीएसएमटी – रु 1,130
  • साईनगर शिर्डी ते नाशिकरोड – रु 600
  • साईनगर शिर्डी ते ठाणे – रु. 1,065
  • साईनगर शिर्डी ते दादर – रु. 1,120

एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) भाडे :

  • साईनगर शिर्डी ते सीएसएमटी – रु. 2,020
  • साईनगर शिर्डी ते नाशिक रोड – रु. 1,145
  • साईनगर शिर्डी ते ठाणे – रु. 1,890
  • साईनगर शिर्डी ते दादर – रु. 1,985

हे सुद्धा वाचा : 

केटरिंग शुल्क:
या ट्रेनमध्ये खाद्यपदार्थांची निवड ऐच्छिक आहे. तथापि, जर कोणी नो फूडचा पर्याय निवडला असेल, तर कॅटरिंग शुल्क भाड्यातून वजा केले जाईल.

विक्रांत पाटील

Recent Posts

कमी मतदानाची झळ कोणाला बसणार…..

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा …

6 mins ago

नगरमध्ये लंके विरूद्ध लंके

नगर मतदार संघातून २ निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत(Lanka vs Lanka in…

1 hour ago

काश्मिर पटेलांना नको होते, पण पंडित नेहरूंनी भारतात आणले !

काश्‍मीर प्रश्‍नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा वर्ग देशात…

2 hours ago

इंदिरा गांधी, पोलादी पंतप्रधान

‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ असे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने इंदिरा गांधींच्या…

4 hours ago

अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर ‘हजर’!

आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी (…

4 hours ago

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी देण्यार्‍यांना गजाआड करा; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी…

4 hours ago