31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगुढीपाडव्यानिमित्त खरेदीतून घरोघरी होणार नवचैतन्याचा गोडवा; नाशिक बाजारपेठ सज्ज

गुढीपाडव्यानिमित्त खरेदीतून घरोघरी होणार नवचैतन्याचा गोडवा; नाशिक बाजारपेठ सज्ज

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) बाजारपेठेत नवचैतन्याचा गोडवा निर्माण झाला आहे. फोर के टीव्ही, डबलडोअर फ्रीज, एसी, स्मार्टफोन्सची यावर विविध ऑफर देण्यात आल्या आहेत.गुढीपाडव्यानिमित्त शहरात घरोघरी आणि चौकाचौकांत गुढी उभारण्यात येणार आहे., तसेच श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करीत जय श्रीरामाचा जयघोष केला जाणार आहे. गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरवात होते.नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्याने या दिवशी सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी, वास्तुप्रवेशाची परंपरा आहे. त्यामुळे बाजारपेठांमधील शोरूम सजल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने आघाडीवर आहेत. शहरात सकाळपासूनच खरेदीची लगबग दिसून आली. या शुभमुहूर्तासाठी शहरात शेकडो चारचाकी आणि दुचाकींचे बुकिंग झाले असून अनेक घरांचेदेखील बुकिंग झाले आहे.(On the occasion of Gudi Padwa, there will be a sweetness of new life from house to house through shopping; Nashik market ready)

चिव्याची काठी, साखरेच्या माळा, फळे, चाफ्यांच्या फुलांची माळ, कलश, मिनी गुढीसह अन्य वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे.बाजारपेठेत नवीन वस्तू खरेदीसाठी उधाण आले आहे. पाडव्‍यानिमित्त वस्तू खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून ग्राहक चौकशीसाठी शोरूममध्ये येत आहेत. गुढीसाठी शहरातील बिंदू चौक, दसरा चौक, मिरजकर तिकटी व टिंबर मार्केट या ठिकाणी चिव्यांचे ढीग लागले आहेत. ८० ते १५० रुपयांप्रमाणे या चिव्यांची विक्री होत आहे.अमावास्येआधी गुढीची काठी नेण्याची प्रथा असल्याने चिव्याची काठी व इतर मिनी गुढी तीनशे रुपयांपर्यंत, नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यासाठी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी मिनी गुढी खरेदीला पसंती दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून मिनी गुढीची मागणी वाढत आहे. ही गुढी साधारण दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे.त्यl नेण्याकडे अनेकांचा कल आहे. शहरातील ठिकठिकाणी साखरेच्या माळांची विक्रीही होत आहे. एका माळेची किंमत २० ते ५० रुपये आहे. गुढीसाठी खास नव्या साड्याही साड्यांच्या दुकानात लक्ष वेधून घेत आहेत.
गुढीची साडी रेडिमेड,गुढी उभा करताना साडी, भरजरी ब्लाऊज पीसचा वापर करतात. गुढीला साडी नेसवताना महिलांना बराच वेळ खर्च करावा लागतो. त्यांची ही अडचण दूर करत विक्रेत्यांनी गुढीची तयार साडी बाजारात आणली आहे. गुढीला शोभणारी ही डिझायनर साडी पैठणी, भरजरी काठाची आणि सुंदर नक्षीकामात बनवली आहे. त्यामुळे यालाही महिला वर्गाची मोठी पसंती मिळते आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे सराफ बाजारही सज्ज आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर 72 हजार रुपयांवर गेले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनीही सवलत योजना जाहीर केल्या आहेत. गुढीपाडव्यानिमित्त गुढीसह काठी, हार-कंगण, फुलहाराची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या सणानिमित्त दूध, बासुंदी, श्रीखंड, जिलबी, गुलाबजाम व इतर पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दुधासाठी डेअरीवर सोमवारी मोठी गर्दी होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी