28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्राईमपोक्सो गुन्ह्यांतर्गत आरोपीला २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

पोक्सो गुन्ह्यांतर्गत आरोपीला २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

सहा वर्षीय चिमुरडिस घरात बोलावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात केस (POCSO case) चालवून अवघ्या ७ महिन्यात आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना गेल्या वर्षी पाथरवट लेन भागात घडली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकाश आबासाहेब ठोंबरे ( वय ४३ वर्ष, रा. पाथरवट लेन, पंचवटी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.ठोंबरे याने १० ते १४ जुलै दरम्यान अंगणात खेळणाऱ्या सहा वर्षीय बलिकेस आमिष दाखवून आपल्या घरात बोलावून घेत हे कृत्य केले होते.(Man sentenced to 20 years rigorous imprisonment under POCSO case)

ही बाब निदर्शनास येताच पीडितेच्या आईने याबाबत पोलिसात धाव घेतल्याने याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा.पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी व मदतनीस पो. कॉ. श्रीकांत कर्पे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायलयात सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्र. ५ च्या न्या. पी. व्ही. घुले यांच्या समोर चालला. सरकारतर्फे ॲड. लीना चव्हाण यांनी काम पहिले. फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेल्या साक्षी आणि तपासी अधिकाऱ्यानी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून न्यायालयाने आरोपीस बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम ६ मध्ये दोषी ठरवत २० वर्ष सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा असे निकालपत्रात नमूद केले आहे.
सरकारतर्फे ॲड. लीना चव्हाण यांनी काम पहिले. फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेल्या साक्षी आणि तपासी अधिकाऱ्यानी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून न्यायालयाने आरोपीस बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम ६ मध्ये दोषी ठरवत २० वर्ष सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा असे निकालपत्रात नमूद केले आहे.

बाल लैंगिक प्रतिबंधक अधिनियम २०१२ मधील तरतुदीप्रमाणे व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. न्यायालयाने सदरचा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने पुर्ण करत अवघ्या सात महिन्यात आरोपीस शिक्षा सुनावली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी