32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंगमनेर मधून नाशिकमध्ये गोमांस विक्री : दोंघांना अटक

संगमनेर मधून नाशिकमध्ये गोमांस विक्री : दोंघांना अटक

संगमनेर येथून नाशिकमध्ये गोमांस विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा संशयितांना गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून जवळपास ५०० किलो गोमांस आणि पिकअप व्हॅन असा एकूण ८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या संशयितांविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

संगमनेर येथून नाशिकमध्ये गोमांस विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा संशयितांना गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून जवळपास ५०० किलो गोमांस आणि पिकअप व्हॅन असा एकूण ८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या संशयितांविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, गुन्हे शाखा एकचे पोअं मुक्तार शेख, आप्पा पानवळ यांना माहिती मिळाली की, संगमनेर येथुन एक संशयित गोवंश जनावंराची कत्तल करून त्याचे मांस विक्री करण्यासाठी मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील खोडेनगर येथे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

 

हि माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि चेतन श्रीवंत, पोना मिलींदसिंग पदरेशी, पोअं मुक्तार शेख, आप्पा पानवळ, राजेश राठोड, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, चासपोउनि किरण शिरसाठ यांच्या पथकाने खोडेनगर येथे सापळा रचून पिकअप क्रमांक एम. एच. १४ डी. एम. ३००६ हिला ताब्यात घेत संशयित अमीर असद कुरेशी, २७, रा. संगमनेर, जि. अहमदनगर आणि सलमान इक्बाल कुरेशी, २८, रा. चौकमंडई भद्रकाली नाशिक यांना ताब्यात घेतले.

नगर जिल्ह्यासह अनेक भागातून नाशिकमार्गे गोमांस मुंबई येथे विक्रीसाठी जात असल्याच्या तक्रारी वारंवार होतात अनेकदा कारवाई देखील केली जाते मात्र काही कालावधीनंतर पुन्हा चोरट्या मार्गाने हि अवैध विक्री सुरु राहते यामुळे यामध्ये नेमका कोणाचा आशीर्वाद आहे ज्यामुळे हा व्यवसाय बिनबोभाट सुरु आहे अशी चर्चा आता नाशिकसह उत्तर महाराष्ट्र मध्ये  मोठ्या प्रमाणात रंगत आहे.
             यावेळी पिकअप वाहनाची तपासणी केली असता पिकअप मध्ये गोवंश जनावरांचे सुमारे ५०० किलो मांस आढळून आल्याने तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावुन मांस तपासणी करून ताब्यात घेत. या संशयितांविरोधात प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५, ५ अ, ९ व ११ अन्वये मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            हि कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोउनि चेतन श्रीवंत, पोना मिलींदसिंग पदरेशी, पोअं / मुक्तार शेख, आप्पा पानवळ, राजेश राठोड, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, चासपोउनि किरण शिरसाठ यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी