33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही निवडणूक म्हणजे शिवसेना ठाकरे गटाची सत्वपरीक्षाच असल्याने महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना निवडून आणण्यासाठी बूथ प्रमुखांनी डोळ्यात तेल घालून आपली भूमिका पार पाडावी,असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे( शिवसेना ठाकरे गट) यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून पंचवटीतील निमाणी मंगल कार्यालयात व नाशिकरोड येथिल कृलथे मंगलकार्यालय येथे आयोजित बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना बडगुजर बोलत होते.

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही निवडणूक म्हणजे शिवसेना ठाकरे गटाची सत्वपरीक्षाच असल्याने महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau waje) यांना निवडून आणण्यासाठी बूथ प्रमुखांनी डोळ्यात तेल घालून आपली भूमिका पार पाडावी,असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar ) यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे( शिवसेना ठाकरे गट) यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून पंचवटीतील निमाणी मंगल कार्यालयात व नाशिकरोड येथिल कृलथे मंगलकार्यालय येथे आयोजित बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना बडगुजर बोलत होते.(Teach traitors a good lesson in Lok Sabha elections: Sudhakar Badgujar )

व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,महानगरप्रमुख विलास शिंदे, कोर कमिटी सदस्य डी.जी.सूर्यवंशी,लोकसभा समन्वयक सुरेश राणे,उपजिल्हाप्रमुख जगन आगळे,महेश बडवे,केशव पोरजे,युवासेना जिल्हाधिकारी राहूल ताजनपूरे,भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे,श्रमिक सेना महानगरप्रमुख मामा राजवाडे,गुलाब भोये, विधानसभाप्रमुख शैलेश सूर्यवंशी,शिवसेना पदाधिकारी विशाल कदम,विकास गिते,योगेश देशमुख,उत्तम कोठूळे,भैया मणियार, मसूद जिलानी,स्वप्निल औटे,राष्ट्रवादि पक्षाचे संजय गालफाडे,उध्दव पवार,सभाजी ब्रिगेटचे शरद लभडे,आम आदमी पक्षाचे योगेश कापसे आदी होते.

बूथ प्रमुख हा प्रत्येक पक्षाचा कणा असतो.बूथ प्रमुखांना त्यांच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या लोकांची इत्यंभूत माहिती असते व त्यांच्याशी आपुलकीचे नातेही निर्माण होते. त्याचा फायदा उचलून बूथप्रमुखांनी उमेदवाराचा आपापल्या परिसरात जास्तीत जास्त प्रचार करावा आणि मशाल ही निशाणी सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे,असे आवाहनही बडगुजर यांनी यावेळी केले.नाशकात शिवसेना ठाकरे गटाची सक्षम बूथरचना असून सर्व बूथ प्रमुखही प्रशिक्षित आणि तेवढ्याच ताकदीचे आहेत.निवडणुकीत या घटकाला विशेष महत्त्व असते हे लक्षात घेऊन सर्व बूथ प्रमुखांनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी,असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाची इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच अन्य मित्र पक्षांशी मिळून महाविकास आघाडी असल्याने या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन घरोघरी जाऊन शिवसेना ठाकरे गट तसेच महाविकास आघाडीची ध्येयधोरणे तसेच उद्धव ठाकरे सरकारच्या काळात घेण्यात आलेले लोकाभिमुख निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा,असे महानगरप्रमुख विलास शिंदे व इंदीरा काॕग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शरद आहेर,यांनी आपल्या मनोगतात सांगितले डी.जी.सूर्यवंशी यांनीही बूथ प्रमुखांची जबाबदारी आणि कर्तव्ये याची माहिती देऊन वाजे यांच्या विजयासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. नाशिक रोड येथे पार पडलेल्या मेळाव्या प्रसंगी उपस्थित मान्यवराच्या हास्ते नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख कनू ताजने,पूर्व विधान सभा समन्वयक चद्रकांत मानभव,जेलरोड विभागप्रमुख कृलदिप आढावा यांचा शाल,श्री फळ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.मेळाव्यास शिवसेना ठाकरे गटाचेसर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच बूथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी