31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeराजकीयभुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने निवडणून आणणार असल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेना पक्षाला सोडल्यानंतर मोठ्या ताकदीने गुरुवारी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ साहेबांची उपस्थितीत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस मधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने निवडणून आणणार असल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी सांगितले. नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेना पक्षाला सोडल्यानंतर मोठ्या ताकदीने गुरुवारी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ (Chagan bhujbal) साहेबांची उपस्थितीत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस मधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Will elect Mahayuti candidate on Bhujbal saheb’s suggestion: Ambadas Khaire)

महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिककयाने निवडणून यावा याकरिता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब रूपरेषा आखत असून नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेतील पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्याना जोमाने कामाला लागण्याच्या सुचना दिल्या आहे. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असून त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला कसा करून देता येईल याकरिता युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी युवक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. प्रचाराकरीता अत्यंत कमी वेळ उरला असून या कमी वेळात जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचण्यासाठी युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आपले काम सुरू केले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब उमेदवारी करणार नसल्याने त्यांच्याकरिता उभारलेली युवकांची यंत्रणा महायुतीच्या उमेदवाराकरिता वापरण्यात येणार असून मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात स्वतंत्र यंत्रणेसह सहभागी होऊन महायुतीची ताकद अधिक वाढवून महायुतीचा उमेदवार सर्वाधिक विक्रमी मतदाधिक्क्याने निवडून येणार असल्याचे विश्वास यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी