32 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कांद्यावर बोलणार? १० मे रोजी पिंपळगावला सभा

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कांद्यावर बोलणार? १० मे रोजी पिंपळगावला सभा

कांदा काढणीचे काम वेगात सुरू झाले असताना व्यापारी, हमाल मापाडी व बाजार समित्यांच्या वादात शेतकरी मात्र नाहक भरडला जात आहे.चांदवड, लासलगाव, दिंडोरी बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी व्यवहार ठप्पच हाेते. दिंडोरी बाजार समितीत सोमवारपासून पूर्ववत कांदा खरेदी सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मनमाडसह इतर बाजार समितीत अद्यापही तिढा सुटलेला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या शेतकऱ्यांकडून उन्हाळ कांदा काढण्यास सुरूवात झाली असून शेतकरी रणरणत्या उन्हात कांदा काढणीच्या कामात व्यस्त आहे.

कांदा (onions) काढणीचे काम वेगात सुरू झाले असताना व्यापारी, हमाल मापाडी व बाजार समित्यांच्या वादात शेतकरी मात्र नाहक भरडला जात आहे.चांदवड, लासलगाव, दिंडोरी बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी व्यवहार ठप्पच हाेते. दिंडोरी बाजार समितीत सोमवारपासून पूर्ववत कांदा (onions) खरेदी सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मनमाडसह इतर बाजार समितीत अद्यापही तिढा सुटलेला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या शेतकऱ्यांकडून उन्हाळ कांदा काढण्यास सुरूवात झाली असून शेतकरी रणरणत्या उन्हात कांदा काढणीच्या कामात व्यस्त आहे.(Will PM Narendra Modi speak on onions in Nashik? Meeting in Pimpalgaon on May 10 )

कांदा निर्यात बंदीवरून नाशिकचे राजकारण अगोदरच तापले त्यात लोकसभा निवडणूकांचा प्रचार सुरू झाल्याने कांदा हा प्रचाराचा मुद्दा झाला आहे. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच नाशिकमधील त्यांच्या सभेत कांद्याच्या विषयावर भूमिका मांडण्याची शक्यता आहे. येत्या १० मे रोजी दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंपळगाव बसवंत येथे सभा घेणार आहेत. त्यावेळी कांदा प्रश्नावर ते बोलण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी कांदा निर्यात बंदी घातल्यानंतर शेतकरी आणि व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त करीत आंदोलने केली होती. लाेकसभा निवडणूकीची घोषणा होण्यापूर्वीच कांदा निर्यात बंदी उठवली जाण्याची शक्यता होती तसे न झाल्याने नाशिक मध्ये कांदा हा प्रचाराचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे खास करून कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे सभा हेाणार आहे, असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी