33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रPawarSpeaks : शरद पवार थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार

PawarSpeaks : शरद पवार थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ विषाणूने देशात शिरकाव केला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार ( PawarSpeaks ) सकाळी ११ वाजता जनतेशी फेसबुकवरून संवाद साधणार आहेत.

राज्यात सोमवारपासून लॉकडाऊन लागू झाला आहे. पण तरीही लोकांकडून त्याचे नीटसे पालन होत नाही. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी घरातच राहणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकांनी बाहेर पडू नये. तरीही अनेकजण घराबाहेर पडत आहेत. दुसऱ्या बाजूला काहीजण पोलिसांवर हल्ले करीत आहेत. भाजीपाला व अन्य खरेदीसाठी लोक झुंबड उडवित आहेत.

PawarSpeaks , Sharad Pawar
शरद पवार सकाळी ११ वाजता फेसबुकवरून जनतेशी संवाद साधणार आहेत

लोकांनी बाहेर जाऊ नये यासाठी शरद पवार ( PawarSpeaks ) यांनी अनेकदा आवाहन केले आहे. ते स्वतः घराच्या बाहेर पडत नाहीत. घरात राहूनच ते वेळ घालवत असल्याचे त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पवार ( PawarSpeaks ) लोकांशी काय संवाद साधणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार – खासदार एक महिन्याचे वेतन ‘कोरोना’साठी देणार

विधानसभा व विधानपरिषदेतील सगळे आमदार, तसेच लोकसभा व राज्यसभेच सगळे खासदार आपले एक महिन्याचे वेतन ‘कोरोना’ निर्मूलनासाठी देणार आहेत. स्वतः शरद पवार ( PawarSpeaks ) यांनी याबाबतचे आदेशवजा पत्र जारी केले आहे. आमदार व खासदारांनी आपल्या एक महिन्याच्या वेतनाचे धनादेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जमा करावेत अशा सुचना पवार ( PawarSpeaks ) यांनी केल्या आहेत.

आमदारांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले जाणार आहे, तर खासदारांचे वेतन पंतप्रधान सहायता निधीसाठी दिले जाणार आहे.

शिवसेनेचे आमदारही एक महिन्याचे वेतन देणार

शिवसेनेच्या आमदारांनीही एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सेनेच्या आमदारांनी आपले धनादेश मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडे जमा करावेत असे आदेश उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

WarAgainstVirus : शरद पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेही उत्कृष्ट काम करीत आहेत : जितेंद्र आव्हाड

शरद पवारांसमोर धनंजय मुंडेंचे ‘आयएएस’स्टाईल प्रेझेंटेशन; उद्धव ठाकरे म्हणाले, तगडा मंत्री !

NCP legislators to donate salary for coronavirus relief

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी