31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रपाचगणी येथे माझी वसुंधरा अंतर्गत वृक्षारोपण

पाचगणी येथे माझी वसुंधरा अंतर्गत वृक्षारोपण

टीम लय भारी

पाचगणी : आशिया खंडांतील दोन नंबरचे पठार व स्वच्छतेत अव्वल नामांकन मिळालेल्या. पाचगणी शहरांमध्ये माझी वसुंधरा अभियानांअतर्गत शहरातील विविध भागामध्ये वृक्षारोपण करुन पाचगणी नगरपालिकेकडून माझी वसुंधरा अभियानाचा वृक्षारोपण मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यासह नगराध्यक्ष लक्ष्मी कर्हाडकर व सर्व नगरसेवकांच्या उपस्थित पाचगणी शहराच्या टेबललॅड येथे पार पडला. यावेळी मुख्याअधिकारी गिरीश दापकेकर यांनी वृक्षरोपणाचा शुभारंभ करत पाचगणीत ३ हजार झाडे लावण्याचा प्रयत्न असणार आहे (Plantation under my planet at Pachgani).

पाचगणी शहराला स्वच्छतेच्या सप्तपदीमध्ये प्रथम क्रमांकाचं मानांकन प्राप्त आहे. पाचगणी शहरात स्वच्छ पाचगणीसह सदाहरीत पाचगणी शहराच स्पप्न माझी वसुंधरा अंतर्गत पाचगणीच्या टेबललॅड, सिडणे पॅाईट तसेच विविध पॅाईंट येथे नगरपालिकेच्या माध्यमातून खड्डे खोदून वृक्षारोपण केले जात आहे.

साताऱ्याचे ‘कास पठार’ पर्यटकांसाठी खुले

नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा झटका

मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांचा पदभार स्वीकारल्यापासून पाचगणी शहरांमध्ये नगर विकास खात्याच्या विविध योजना राबवण्याकरीता कृतीशील आरखडा कर्मचारी व सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवण्यात येत आहे (It is being implemented effectively through all the corporators).

नरेंद्र मोदींचे राजकारणातले संकटमोचक मित्र अरुण जेटली

Mumbai news today LIVE updates: Union minister Narayan Rane arrested for his ‘slap’ remark against Uddhav Thackeray

पाचगणी शहरातील सदाहरीत पाचगणी या घोषवाक्याअतर्गंत विविध ठीकाणी वृक्षारोपण होत असताना. वृक्षरोपणाअंतर्गत वृक्षारोपण केलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जवाबदारी सुद्धा योग्य रितीने पार पाडण्याकरीता योग्य ती काळजी नगरपालिकेच्या माध्यमातून घेतली जात असल्याची महत्वपुर्ण माहीती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली. ‘अर्बन ट्री क्लस्टर’ ही संकल्पना राबवत २.०० आर क्षेत्रांमध्ये स्थानिक प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करण्यात आलेल्या सर्व झाडांचे संगोपन करण्याची शपथही घेण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी