31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रगेमिंग ॲपमुळे पोलीस अधिकारी मालमाल; एका रात्रीत झाला कोट्यधीश

गेमिंग ॲपमुळे पोलीस अधिकारी मालमाल; एका रात्रीत झाला कोट्यधीश

सध्या भारतात क्रिकेट वर्ल्ड कपचे वारे वाहत आहेत. वर्ल्ड कपवर नाव कोरण्यासाठी दहा देशांचे संघ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी वर्ल्डकप म्हणजे एक पर्वणी आहे. त्याचबरोबर, क्रिकेट फॅन्स मॅच बघण्यासोबतच ऑनलाइन फॅंटसी गेमिंग ॲपवर सुद्धा टीम बनवून गेम खेळत असतात. अशातच, पुण्यात एका पोलिसाला तब्बल दीड कोटीची लॉटरी लागली आहे. सोमनाथ झेंडे असे या पोलिस अधिकाऱ्यांचे नाव असून त्यांनी ऑनलाईन फॅंटसी गेमिंग ॲपवर बनवलेल्या टीम सर्वोत्कृष्ट ठरली आहे.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहेत. ऑनलाइन फॅंटसी गेमिंग ॲप असलेल्या ड्रीम 11 या अप वर मागील 3 महिन्यांपासून ते गेम खेळू लागले होते. मंगळवारी, (10 ऑक्टोबर) झालेल्याा इंग्लंड विरुद्ध बांगलादेश सामन्यात त्यांनी ड्रीम 11 वर टीम लावली होती. त्यात त्यांनी सर्वाधिक पॉईंट्स मिळवत अव्वल स्थान पटकावले आणि तब्बल 1.50 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले. एवढी मोठी रक्कम बक्षीस स्वरूपात मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे आणि त्यांच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

इंग्लंड विरुद्ध बांगलादेश सामन्यामुळे पालटले नशीब


मंगळवारी झालेल्या इंग्लंड विरुद्ध बांगलादेश सामन्यात इंग्लंडने बांगलादेशचा 137 धावांनी पराभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 विकेट्सच्या बदल्यात 364 धावा चोपून काढल्या. इंग्लंडच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना बांगलादेशचा डाव 227 धावांत डगमगला. या सामन्यावर सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम 11वर अचूक टीम बनवत बाकीच्या स्पर्धकांविरुद्ध अव्वल क्रमांक पटकावला.

हे ही वाचा 

आता मराठी मनोरंजन उद्योगाची चर्चा परिषद!

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरप्रकरणी पडला हरकतीचा पाऊस

शिंदेंचा दसरा मेळावा क्रॉस मैदानावर? ठाकरेंचा शिवाजी पार्कवर

दीड कोटी जिंकल्यामुळे झेंडेंच्या घरी उत्सवाचा माहौल

ड्रीम 11वर दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे आणि त्यांच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ड्रीम 11 वर बक्षीस जिंकल्यावर आधी त्यांना विश्वास बसला नव्हता. परंतु, त्यांच्या खात्यावर दोन-दोन लाख याप्रमाणे पैसे यायला सुरुवात झाली. सोमनाथ झेंडे आता कोट्यधीश झाले असून एक रात्रीत त्यांचे नशीब पालटले आहे.

ऑनलाइन फॅंटसी गेमिंग ॲपवर टीम बनावताना स्पर्धकांनी स्वत:च्या जबाबदारीवर हा खेळ खेळावा. यावर कोट्यधीश झाल्याची उदाहरणे जारी असली तरी आर्थिक भुर्दंड सोसावा लागणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी