28 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरराजकीयभाजप आमदाराने शरद पवारांच्या केलेल्या एकेरी उल्लेखावर सुप्रिया सुळे चिडीचूप, पण वकिलावर...

भाजप आमदाराने शरद पवारांच्या केलेल्या एकेरी उल्लेखावर सुप्रिया सुळे चिडीचूप, पण वकिलावर मात्र भडकल्या !

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, राम मनोहर लोहिया, मधू लिमये, नाथ पै अशी संसदीय लोकशाहीतील परंपरा आपल्याकडे असताना, गेल्या काही वर्षापासून राज्यात आणि देशात भाजपचे सरकार आल्यापासून ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे ब्रीद मिरवणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यापासून आमदार, नेत्यापर्यन्त सगळ्यांची जीभ सैल सुटली आहे. ज्येष्ठ, अनुभवी नेते यांच्याबद्दल बोलताना ही भाजपवाले एकेरी उल्लेख करायला मागे पुढे पाहत नाही, याचे ठळक उदाहरण म्हणजे माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे. आमदार जयकुमार गोरे यांनी 83 वर्षांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एका भाषणात एकेरी उल्लेख केला आहे. एकेकाळी कॉँग्रेसमधून निवडून आलेल्या या ‘गोरे’ यांच्या ‘जिभेला’ आवर घाला अशी मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे. तर शरद पवारांचा एकेरी उल्लेख करण्यावरून वकिलाला धमकावणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी जयकुमार गोरेंच्या व्यक्तव्याबाबत सोयीस्कर मौन बाळगले आहे. याचे सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे.

राजकारण म्हटले की आरोप-प्रत्यारोप हे आलेच. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही महिन्यापूर्वी शरद पवार यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना योग्य भाषेत समज दिली होती. या पूर्वीही भाजप नेत्यांनी अनेकदा महिलांबाबत अपशब्द काढल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. यावरूनच राज्याचे राजकारण हे खूपच खालच्या थराला गेले असल्याचे बऱ्याचदा पाहायला मिळत आहे.

अशातच आता माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी 83 वर्षांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एका भाषणात एकेरी उल्लेख केला आहे. गोरे यांच्या वयापेक्षा जास्त शरद पवार यांचे संसदीय राजकारण आहे. असे असताना शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांनी शालीन राजकारणाचा वास्तूपाठ समोर ठेवला आहे.

पण आताचे सत्ताधारी आणि त्यांचे बगलबच्चे विरोधी पक्षातील नेत्यांचा अनुभव, वय न पाहता काहीही बरळत असतात. मात्र शरद पवार यांची लेक आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी, शरद पवारांचा एकेरी उल्लेख करण्यावरून वकिलाला धमकावले. पण गोरे यांनी पवार यांचा एकेरी उल्लेख केलेला असताना त्या शांत का बसल्या आहेत. असा प्रश्न राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

हेही वाचा 

महिलांनो आता रस्त्यावर उतरा…असे का म्हणाले शरद पवार

शरद पवारांचा खेळच न्यारा… भुजबळ पवारांबद्दल काय बोलले?

भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यासाठी रेल्वे विभागाकडून क्रिकेट चाहत्यांना आगळीवेगळी भेट

कुणीतरी शरद पवारांचा उल्लेख ‘तो शरद पवार’ केल्यामुळे सुप्रिया सुळे यांचा पारा चढला आणि त्यांनी या रागाच्या भरातच त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची धमकी दिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला माण-खटावचे आमदार जयकुमार गोरेंनी देखील शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला आहे. मात्र यावेळी सुप्रिया सुळे यांनी जयकुमार गोरेंना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एवढया मोठ्या नेत्याचा जयकुमार गोरेंनी केलेला एकेरी उल्लेख हा चुकीचाच आहे.

भाजप हा ‘संस्कारी’ पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ज्येष्ठ नेत्याबद्दल बोलताना आदर राखला पाहिजे. भाजपाने आपल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, आमदारांना योग्य समज द्यावी. माण-खटाव या विधानसभा मतदार संघाचे गोरे हे दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करत आहेत. पण त्यांच्या काळात या भागातील पाण्याचा प्रश्न काही मिटला नाही. त्यांच्या विधानसभा मतदार संघातील महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. असे असताना गोरे यांनी हा महत्वाचा प्रश्न सोडवायला प्राधान्य दिले पाहिजे. असे असताना या गंभीर प्रश्नावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते अशी वादग्रस्त विधाने करत आहेत. पण यंदाच्या निवडणुकीत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू असे राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी