31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रसैनिक प्रवेश परिक्षेत राजवर्धन भानुसेचा अटकेपार झेंडा

सैनिक प्रवेश परिक्षेत राजवर्धन भानुसेचा अटकेपार झेंडा

देश पातळीवरील सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत राजवर्धन भानुसे याने यश संपादन केले आहे. राजवर्धन भानुसे हा आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडी येथील राहणारा आहे. सैनिक स्कूल सोसायटी द्वारे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होऊन राजवर्धन भानुसे याने एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल सांगली येथे मेरिट लिस्ट मधून प्रवेश मिळवला. त्यानंतर गणित संबोध शिष्यवृत्ती परीक्षेतही तो टॉपर आला असून महाराष्ट्र शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत टॉपर आला आहे व आता केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया परीक्षेत त्याने रायगड जिल्ह्यामध्ये दुसरा रँक पटकावला आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात निजामपूर येथे नवोदय केंद्रीय विद्यालय आहे. दरवर्षी फक्त 80 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. नवोदय केंद्रीय विद्यालय ही केंद्रशासन अनुदानित शाळा आहे. या शाळेत तिन्ही परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते. गुणवत्ता यादीत राजवर्धन वामन भानुसे याने द्वितीय स्थान मिळवले. हा विद्यार्थी ओबीसी प्रवर्गातून प्रथम आला आहे. त्याने अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीतून असामान्य यश मिळविले आहे.

हे सुध्दा वाचा:

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस उद्यापासून सुरु होणार, जाणून घ्या वेळापत्रक

राज्यात तलाठी पदांची भरती; जाणून घ्या कुठे आणि कसा भरता येणार अर्ज

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्यसेवांचा अभाव, सर्पदंशाने महिलेने गमावले प्राण

या माध्यमातून त्याने पनवेल तालुक्याचे व त्याच्या गावाचे, झरे, कुरुंदवाडी, पारेकरवाडी, विभूतवाडी, गुळेवाडी या आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील पंचक्रोशीचे नाव उज्वल केले आहे. आपल्या यशाचे श्रेय तो कळंबोली येथील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे सीमा जगताप मॅडम, वर्षा मॅडम, देशमुख सर व त्यांचा पूर्ण स्टाफ तसेच त्याच्या वर्गशिक्षिका वैशाली फुलपगार मॅडम, प्राचार्य पालवे सर व आई वडील यांना दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी