27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस उद्यापासून सुरु होणार, जाणून घ्या वेळापत्रक

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस उद्यापासून सुरु होणार, जाणून घ्या वेळापत्रक

ओडिसा ट्रेन अपघातामुळे मडगाव- मुंबई वंदे भारत ट्रेनचा शुभांरभ पुढे ढकला होता. मात्र आता वंदे भारतला हिरवा कंदील 27 जूनला मिळणार आहे. मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे उदघाटन 27 जून रोजी गोव्याहून निघेल. 28 जूनपासून नियमित सेवा सुरू होईल. या ट्रेनची नियमित सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे 5:25 वाजता पावसाळ्यात सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता मडगावला पोहोचणार आहे. परतीच्या दिशेने, ट्रेन क्रमांक 22230 मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी 12:20 वाजता मडगावहून सुटेल आणि 10:25 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.

पावसाळ्यानंतर म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावेल. ट्रेन क्रमांक 22229 सीएसएमटी मुंबईहून सकाळी 5.25 वाजता सुटेल आणि दुपारी 1.10 वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक 22230 मडगावहून दुपारी 2.40 वाजता सुटेल आणि रात्री 10.25 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे थांबे असतील. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे नियमित बुकिंग 26 जून रोजी सुरू होईल.

हे सुध्दा वाचा:

राज्यात तलाठी पदांची भरती; जाणून घ्या कुठे आणि कसा भरता येणार अर्ज

घाटकोरमध्ये इमारत कोसळून माय लेकाचा मृत्यू; मंगलप्रभात लोढा यांची घटनास्थळी भेट

वीज ग्राहकांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळी बिले येणार, केंद्र करतय ग्राहक हकक नियमात सुधारणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून गोवा (मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस) यासह विविध शहरांसाठी पाच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून या सोहळ्याला हिरवा झेंडा दाखवतील. भोपाळ, ते राणी कमलापती (भोपाळ)-इंदूर, भोपाळ-जबलपूरसाठी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. त्याशिवाय ते रांची-पाटणा, धारवाड-बेंगळुरू आणि मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवतील. सीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.शिवराज मानसपुरे यांनी सांगितले. ट्रेन सुरू झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पर्यटनाला चालना मिळेल आणि प्रवासाचा आरामदायी आणि जलद मार्ग उपलब्ध होईल. कमीत कमी वेळेत पर्यटन स्थळांना भेट देता येते. प्रवासाचा वेळही वाचेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी