31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeनोकरीराज्यात तलाठी पदांची भरती; जाणून घ्या कुठे आणि कसा भरता येणार अर्ज

राज्यात तलाठी पदांची भरती; जाणून घ्या कुठे आणि कसा भरता येणार अर्ज

तलाठी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात तलाठी भरती होणार आहे. राज्यातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यातील तलाठीच्या पदाची जागा 4,644 हजार इतकी आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज आज 26 जून पासून सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै आहे. या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे.

https://mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरता येईल. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही 38 असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 असणार आहे. तलाठीची परीक्षा ही 2 तासांची आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक ज्ञान असा 200 गुणांचा पेपर असणार आहे. या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

हे सुध्दा वाचा:

घाटकोरमध्ये इमारत कोसळून माय लेकाचा मृत्यू; मंगलप्रभात लोढा यांची घटनास्थळी भेट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्यसेवांचा अभाव, सर्पदंशाने महिलेने गमावले प्राण

दापोली हर्णे मार्गावर ट्रक व मॅजिक रिक्षाचा अपघात; आठ जणांचा मृत्यू

पदाचे नाव- तलाठी
पद संख्या- 4644 जागा
शैक्षाणिक पात्रता- पदवीधर
वयोमर्यादा- 18 ते 38 वर्ष
परीक्षा शुल्क- खुला वर्ग- 1000 तर राखीव वर्ग 900
अर्ज पद्धती- ऑनलाईन 26 जूनपासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- https://mahabhumi.gov.in

विभागाचे नाव आणि रिक्त पदे
1. कोकण विभाग- 500 रिक्त पदे
2. नाशिक विभाग- 689 रिक्त पदे
3. पुणे विभाग- 602 रिक्त पदे
4. औरंगाबाद विभाग- 685 रिक्त पदे
5. नागपूर विभाग- 478 रिक्त पदे
6. अमरावती विभाग- 106 रिक्त पदे

कागदपत्रे आवश्यक-

बायोडेटा (Resume)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला
ओळखपत्र
पासपोर्ट साईझ फोटो

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी